'एका दिवसासाठी 5-10 लाख...', पैसे उधळत धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे 'सैराट' फेम अभिनेत्यानं उघडले डोळे

Sairat Fame Actor On Wedding : 'सैराट' फेम अभिनेत्यानं खूप खर्च करत लग्न करणाऱ्यांचे उघडले डोळे...

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 01:19 PM IST
'एका दिवसासाठी 5-10 लाख...', पैसे उधळत धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे 'सैराट' फेम अभिनेत्यानं उघडले डोळे title=
(Photo Credit : Social Media)

Sairat Fame Actor On Wedding : 'सैराट' या चित्रपटानं फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताना वेड लावलं होतं. चित्रपटातील गाणी आणि पटकथा या सगळ्यांनीच लक्ष वेधलं. या चित्रपटात असणाऱ्या आर्ची, परशा, लंगड्या, सल्या या भूमिका साकारत सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्यानंतर यापैकी कोणीही मागे वळून पाहिलं नाही. कारण प्रत्येक कलाकार हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सगळ्यात नुकताच सैराट या चित्रपटात लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजी गळगुंडेनं असं काही वक्तव्य केलं की तो चर्चेत आला आहे. त्यावेळी त्यानं लग्नव्यवस्था आणि लिव्ह-इन रिलेशनशिपवर त्याचं मत मांडलं आहे. 

तानाजी गळगुंडेनं 'आरपार ऑनलाईन' या यूट्यूबल चॅनलला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यानं लग्नाविषयी असलेलं त्याचं मत मांडलं. त्याला ही लग्न व्यवस्था पटत नसल्याचं त्यानं ठाम मत मांडलं. याविषयी बोलताना तो म्हणाला, 'खूप पुढे गेलो अस वाटत असेल पण मला आता फक्त लिव्ह इन रिलेशनशिप हे पटतं. लग्नाआधीच एक गोष्ट पाहायची की त्या व्यक्तीला तुम्ही आवडता का? त्या मुलीला आपण आवडतो की नाही हे माहित नाही आणि थेट तिच्याशी लग्न करायचं. मुळात त्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि फक्त एका दिवसासाठी एवढा मोठा तामझाम करायचा आणि त्यासाठी 5-10 लाख खर्च करायचे. हे इथेच नाही खर्च करुन झाल्यावर वाजत-गाजत वरात काढायची. बॅंड-बाजा लावून नाचायचं ही चांगली गोष्ट आहे, नाचू आपण पण एखादी छोटीशी पार्टी, असं मला वाटतं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे तानाजी म्हणाला की 'लग्न करायचं आहे तर आता माझा याविषयी वेगळा विचार आहे. मला त्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप हे सगळ्यात चांगलं वाटतं. पण जर त्यातही लग्न करायचं असेल तर रजिस्टर्ड करायचं, असं मला वाटकं. जास्त खर्च करु नका. 2-4 हजारात लग्न करायचं, जो हार-तुरा घालायचा आहे तो घालायचा. त्यानंतर एक छोटीशी पार्टी करायची.' 

हेही वाचा : 'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

तानाजी गळगुंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याला सैराट या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो 'गस्त', 'माझा अगडबम', 'फ्रि हिट दणका', 'एकदम कडक', 'घर बंदूक बिरयानी' आणि अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या चित्रपटात देखील दिसला आहे.