सैफ अली खान पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत

ओम राऊतने सिनेमात सैफ असण्याची घोषणा केली 

Updated: Sep 3, 2020, 10:28 AM IST
सैफ अली खान पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास स्टारर सिनेमा 'आदिपुरूष' मध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. या सिनेमाला ओम राऊत दिग्दर्शित करत आहेत. ओम राऊतसोबत सैफचा दुसरा सिनेमा आहे. या अगोदर सैफने 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' खलनायकाची भूमिका साकारली आहे. 

ओम राऊतने सिनेमात सैफ असण्याची घोषणा केली आहे. या सिनेमाचा पोस्टर देखील शेअर करण्यात आला आहेय. सोबत लिहिलं आहे की,'७००० वर्षांअगोदर जगात सर्वात बुद्धिमान दानव होता. #Adipurush'

या सिनेमाची निर्मिती टी सीरिज करत आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत प्रभास असून तो रामची भूमिका साकारत आहे. सिनेमा 3D असणार आहे. किर्ती सुरेश सिनेमात सीतेची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी भाषेसोबत इतर ५ सिनेमांत तयार केला जाणार आहे.

सैफने या रोलबद्दल सांगताना म्हटलं की,'ओमी दादासोबत दुसऱ्यांदा काम करण्याची उत्सुकता आहे. त्यांच्या जवळ ग्रँड व्हिजन आणि टेक्निकल नॉलेज आहे. मी प्रभाससोबत काम करण्यास उत्सूक आहे.'