करिनानंतर सैफला ही या सिनेमाची ऑफर

बॉलिवूडची ही जोडी एकत्र दिसणार

Updated: Aug 13, 2018, 12:20 PM IST
करिनानंतर सैफला ही या सिनेमाची ऑफर title=

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या 'लाइफ इन अ मेट्रो' या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये सैफ अली खान दिसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांना अभिनेता सैफ अली खानला याबाबत विचारणा केली आहे. सैफला या सिनेमामध्ये काम करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जर सैफ या सिनेमात काम करायला तयार झाला तर करीना आणि सैफच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे कारण करीना कपूर खान या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे.

कुटुंबासोबत वेळ घालवतो सैफ

सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवतो. काही दिवसांपूर्वीच तैमूरचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. ज्यामध्ये सैफ तैमूरसोबत बॅडमिंटन खेळत होता. तैमूरचे आजोबा नवाब पटौदी हे देखील एक खेळाडू आहे. सैफ आणि करीना जेव्हा शूटिंगसाठी बाहेर जातात तेव्हा तैमूर नेहमी त्यांच्या सोबत असतो.

इब्राहिमला ही करायचंय सिनेमामध्ये करिअर

सैफचा पहिला मुलगा इब्राहिम अली खान देखील सैफच्या खूप जवळ आहे. इब्राहिम जेव्हा एका सिनेमागृहातून बाहेर पडला तेव्हा अनेक जण त्याला सैफचं समजत होते. इब्राहिम अली खान सैफची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा आहे. इब्राहिमची मोठी बहीण सारा अली खानने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इब्राहिमला देखील सिनेमामध्ये काम करायचं आहे.