सैफने जुना फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर; भाडे ऐकून तुम्हाला बसेल मोठा धक्का

सैफने त्याचा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वार दिला आहे.

Updated: Aug 18, 2021, 08:03 AM IST
सैफने जुना फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर; भाडे ऐकून तुम्हाला बसेल मोठा धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैफने त्याचा जुना फ्लॅट भाडेततत्त्वावर दिला आहे. मुंबईतील फॉर्च्यून हाईट्समधील फ्लॅट सैफने भाड्याने दिला आहे. या फ्लॅटमध्ये सैफ आणि अभिनेत्री करीना कपूर खान राहत होती. जहांगीरच्या जन्मापूर्वी खान कुटुंब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले आहे. सैफने भाडेतत्त्वावर दिलेल्या फ्लॅटचं भाडं ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. सैफने हा फ्लॅट एसोसिएशन मीडिया LLP च्या गिल्टी नावाच्या एक फर्मला दिला आहे. 

मनी कंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार  इंडेक्सटॅप डॉट कॉमने एक रजिस्टर्ड रेंट एग्रीमेंटचे कागपत्र समोर आल्यामुळे माहिती मिळाली आहे. फ्लॅट घेतलेल्या पार्टीने खान कुटुंबाला 15 लाख रूपये दिले आहेत. सैफचा हा फ्लॅट प्रशस्त आहे, शिवाय अपार्टमेंटमध्ये दोन पार्किंग आहे. सैफने फ्लॅट तीन वर्षांसाठी  भाडे तत्वावर दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहिल्या वर्षी  फ्लॅटचं भाडं प्रत्येक महिन्यासाठी 3 लाख 25 हजार रूपये असणार आहे. दुसऱ्या वर्षासाठी  3 लाख 76 रूपये  तर तिसऱ्या वर्षासाठी 3 लाख 87 हजार रूपये भाड्यासाठी मोजावे लागणार आहेत. 

सैफच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरचं 'भूत पुलिस' (Bhoot Police) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात सैफ शिवाय  अर्जुन कपूर, यामी गौतम, जॅकलीन फर्नांडिस सोबत अन्य मोठे कलाकार देखील असणार आहेत. चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.