Saif Ali Khan and Amrita Singh Divorce : बॉलिवूडमध्ये अनेक चर्चित जोडपी आहेत. काही जणांनी आपलं प्रेम पुढे नेत संसार देखील थाटला. काही जणांचा डाव अर्ध्यावरच मोडला. चर्चेत असलेल्या जोडप्यांमध्ये अमृता सिंह (Amrita Singh) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचंही नाव येतं. अमृताला पाहताच सैफ अली खान तिच्या प्रेमात पडला होता. मग 1991 साली या दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. खरं तर या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारून दोघांनी लग्न केलं.
अमृता सिंह ही सैफ अली खानपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याने त्या काळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र आपल्या निर्णयावर दोघंही ठाम राहीले. असं असताना 13 वर्षानंतर सैफ आणि अमृता यानी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2004 साली दोघांनी घटस्फोट घेतला. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं असून त्यांची नावं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी आहेत. सारा अली खान आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवत आहे. असं असताना घटस्फोटानंतर सैफ आणि अमृता एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीचं कारण ठरली होती ती म्हणजे सारा अली खान...
हेही वाचा : Devoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'
मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खानने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया युनिवर्सिटीत दाखला घेतला होता. यासाठी साराला अमेरिकेत सोडण्यासाठी सैफ आणि अमृता दोघं तिथे पोहोचले होते. तेव्हा सारानं वडिलांसोबत डिनरचा बेत आखला होता. तेव्हा साराने आई अमृताला देखील तिथे बोलवलं होतं. घटस्फोटानंतर अमृता आणि सैफची पहिलीच भेट होती.
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान यांनी 16 ऑक्टोबर 2012 साली लग्न केलं. करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. या दोघांची लव्हस्टोरी टशन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली. या दोघांच्या लग्नात सारा अली खानही हजेरी लावली होती. सावत्र आई असूनही करीना आणि साराचं चांगलं बॉन्डिंग आहे