पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 10, 2024, 01:51 PM IST
पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन! title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar : मागच्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकली. सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली ती नेटफ्लिक्स वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' या चित्रपटातून. बॉलिवुडमध्ये सईनं पुन्हा एकदा पुनरागमन करून 'भक्षक' मधल्या जस्मीत गौर या एका पोलिसअधिकाऱ्याची भूमिका साकारून तिनं तिचा उल्लेखनीय अभिनय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असून त्यातून एक खास संदेश देण्यात आला आहे. 

सईनं आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. स्त्री सक्षमीकरण असलेल्या तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांतून आपण सगळ्यांनी तिला पाहिलं. तर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं जातंय हे देखील तितकच खरं! भक्षकमध्ये जस्मीत गौर ही प्रेक्षकांना आपलंसं करणारी ठरली आहे आणि म्हणून सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांसोबत सई दिसली आहे. चित्रपटाचा विषय वेगळाच असल्यानं हा चित्रपट खास ठरतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे पुढे जाऊन त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आल आहे. मराठीच्या पलिकडे जाऊन बॉलिवूडमध्ये सईनं तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

सईनं पहिल्यांदाच रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट केला आहे. तर येत्या काळात ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये अशा वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. 2024 वर्षातला सईचा हा दुसरा प्रोजेक्ट्स आहे. भक्षक या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

हेही वाचा : ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

सईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा श्रीदेवी प्रसन्न हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. गावची ‘श्रीदेवी’ आणि मुंबईतला ‘प्रसन्न’ यांची ही कथा या चित्रपटातून पाहायला मिळाली आहे. त्या श्रीदेवी आणि प्रसन्न एका ऑनलाईन मॅट्रीमोनियल साईटवरून भेट होते. मॅट्रिमोनी साइटवर श्रीदेवीला तो रिक्वेस्ट पाठवतो आणि त्यानंतर जेव्हा ती ही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करते. त्यानंतर त्यांचा हा सगळा प्रवास कसा आहे ते पाहायला मिळालं आहे.