सई ताम्हणकरनं दिली गौतमी देशपांडेच्या रिलेशनशिपची हिंट! 'या' अभिनेत्या करते डेट?

Gautami Deshpande : गौतमी देशपांडेच्या त्या फोटोवर सईनं केलेल्या कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांमध्ये अशी चर्चा सुरु आहे की गौतमी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 24, 2023, 04:00 PM IST
सई ताम्हणकरनं दिली गौतमी देशपांडेच्या रिलेशनशिपची हिंट! 'या' अभिनेत्या करते डेट? title=
(Photo Credit : Social Media)

Gautami Deshpande : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गौतमी देशपांडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीला माझा होशील ना या मालिकेतून खरी ओळख मिळाली. ही मालिका संपली असली तरी देखील तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. त्याचं उलटं झालेलं असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांचे संख्या वाढत आहे. सोशल मीडियावर गौतमी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गौतमी आणि तिची बहिण मृण्मयी दोघेही अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचे कारण काही व्हायरल झालेले फोटो आहेत. 

मृण्मयीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमी आणि मृण्मयीनं एका लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यातले काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्या पोस्टनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मृण्मयीनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ती, तिचा पती स्वप्निल, मृण्मयी आणि अभिनेता स्वानंद तेंडुलकर आहे. स्वानंद तेंडुलकरनं गौतमीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : शिल्पा शेट्टीची बहीण शमिता का आहे अविवाहीत? घरच्यांकडून होतो लग्नासाठी दबाव!

मृण्मयीनं हे फोटो शेअर करत कार्तिकीच्या लग्नातील शेवटचे फोटो असं कॅप्शन दिले आहे. मृण्मयीच्या या फोटोवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष अभिनेत्री सई ताम्हणकरनं 'अरे स्वानंद' असं कॅप्शन दिलं आहे. तर त्यावर उत्तर देत स्वानंदनं 'हांजी' अशी कमेंट केली तर, गौतमीनं 'हम्म हम्म हम्म अशी कमेंट केली.' दरम्यान, कार्तिकीनं मात्र, कमेंट करत 'आमचा देखील कधी फोटो टाका अशी रिक्वेस्ट केली आहे.' एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'गौतमी आणि स्वानंदी खरंच एकदा त्याविषयी खरं काय ते सांगा, मला माफ करा जरा मी चुकीचा असेल तर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हम साथ साथ है.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा.' दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'ती माझा होशील ना' या मालिकेनंतर फार कुठं दिसली नाही.