नवी दिल्ली : स्त्रीवाद किंवा आणखी काही म्हणा. या संकल्पनेबाबत प्रत्येकाचं आपलं असं वेगळं मत आहे. काहींना तर ही संकल्पनाच पटत नाही. अशा सर्वजणांमध्ये सध्या चर्चेत आली आहे ती म्हणजे एक मॉडेल. पतीची प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे, आपल्याबद्दल त्याला तितकी माहिती नसेल तरीही फारसा फरक पडत नाही, असं म्हणणाऱ्या या मॉडेलची सध्या खिल्लीही उडवली जात आहे.
आपल्या वक्तव्यामुळं चर्चेत आलेली ही मॉडेल म्हणजे सदफ कनवल (sadaf kanwal). तिनं असं काही वक्तव्य केलंय की त्यामुळं #Our husband is ourCulture हा हॅशटॅग कमालीचा ट्रेंड करत आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियावर हा ट्रेंड दिसत असून, त्यासोबत (pakistan) पाकिस्तानमधीलच एका वाहिनीवरील सदफच्या मुलाखतीचा काही भाग प्रचंड व्हायरल होत आहे.
स्त्रीवाद आणि तत्सम प्रश्नांवर सदफनं यावेळी उत्तर दिलं. आपली संस्कृती काय आहे? या प्रश्नाचं उत्तर देत सदफनं पतीच सर्वकाही आहे, अशा शब्दांत आपलं उत्तर दिलं. 'मियाँ (पती) म्हणजेच आपली संस्कृती आहे. मी लग्न केलंय तर मी त्याचे बूटही उचलणार. त्याच्या कपड्यांना ईस्त्रीही करणार... मी ते नाही करत किंबहुना कमी करते', असं काहीसं उत्तर तिनं दिलं.
Aaj kal bohat liberals aa gaye haiN... pic.twitter.com/0De5pPivxQ
— Reema Omer (@reema_omer) July 30, 2021
'मला ठाऊक असतं की माझ्या पतीचे कपडे कुठे आहेत. त्याची कोणती गोष्ट कुठे आहे हे मला माहित असतं. त्यांना काय खावंसं वाटतं हे मला माहित असायला पाहिजे कारण मी त्याची पत्नी आहे. कारण मी एक स्त्री आहे. त्यांना माझ्याबाबत माहिती नसेल तरीही हरकत नाही, पण मला त्यांच्याबाबत सर्वकाही माहिती हवं..', असं म्हणत स्त्रीवाद म्हणजे मी माझ्या पतीची काळजी घेणं असंच वक्तव्य तिनं केलं. सदफच्या या मुलाखतीचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांनीच तिची खिल्लीही उडवली आहे.