Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. 

Updated: Jan 22, 2023, 08:25 PM IST
Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल title=

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद (Saba Azad) फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. आता ते दोघं अनेकदा स्पॉट होतात परंतु नेटकरी त्यांना पुन्हा पुन्हा धारेवर धरताना दिसतातच. त्या दोघांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज (Videos) व्हायरल होत असतात. त्यातूनही सध्या त्यांचा असाच एक फोटो व्हायरल (Viral Photos) होतो आणि त्यामुळे सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे. आता या फोटोवरून सबा आणि हृतिक एकमेकांशी लग्न (Marriage) करणार का यावर आता त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चाचा ठरतो आहे. 

हृतिकची सख्खी बहीण सुनैना रोशन (Sunaina Roshan Birthday) हिच्या वाढदिवसानिमित्तानं संपुर्ण रोशन कुटुंबीय एकत्र जमले होते त्यात सबा आझादही रोशन कुटुंबियांच्या आनंदात सहभागी झाली आहे. तेव्हा या फोटोमुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये सबा रोशन कुटुंबियांसोबत आनंद लुटता दिसते आहे. या फोटोत ती हृतिकच्या जवळ उभी असलेली दिसते आहे. 

या फोटोत राकेश रोशन (Rakesh Roshan), राजेश रोशन (Rajesh Roshan), पाशमिना रोशन त्याचसोबतच हृतिक रोशनची दोन्ही मुलं हरिधान आणि रेहानही (Hritik Roshan Sons) यावेळी उपस्थित होते. यावेळी हृतिकची आई पिंकी रोशनही (Pinky Roshan Instagram Post) उपस्थित होत्या. यावेळी पिंकी रोशन यांनी इन्टाग्रामवरून आपल्या मुलीला सुनैनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला एक मोलाचा संदेशही दिला आहे. या फोटोमध्ये बर्थडे सेलिब्रेशनचे काही क्षण टिपलेले आहेत. ज्यात सबा आझादही उपस्थित राहिल्याचे दिसते आहे. त्याचसोबतच सबानंही यावेळी आपला बॉयफ्रेंड हृतिक रोशनच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिवाळीपासून ख्रिसमस आणि न्यू ईयर पर्यंत सबा आणि हृतिक अनेकदा स्पॉट झाले आहेत. त्याचबरोबर एक अनेकदा फॅमिली गेट टू गेदरलाही दिसतात. त्याचबरोबर मुंबईतही ते दोघं अनेकदा एकमेकांना डेट करतानाही दिसले आहेत. करन जोहरच्या (Karan Johar Birthday) 50 व्या वाढदिवशी ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर लंडनमध्येही (London) ते दोघं एकत्र दिसले होते. हृतिक रोशन लवकरच त्याच्या आगामी फायटर या चित्रपटातून दिसणार आहे.