दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे धक्कादायक मागणी ऐकून सरकेल पाया खालची जमीन

 'साथ निभाना साथिया 2' मध्ये झककलेली ही अभिनेत्री इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Updated: Oct 1, 2021, 04:37 PM IST
दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे धक्कादायक मागणी ऐकून सरकेल पाया खालची जमीन title=

मुंबई : लोकप्रिय टेलिव्हिजन शो 'साथ निभाना साथिया 2' मध्ये गेहनाच्या भूमिकेत दिसलेली स्नेहा जैन,  इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की, जेव्हा स्नेहाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला सुरुवात केली  होती तेव्हा तिला खूप वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता स्नेहाने भूतकाळातील काही वेदनादायक घटना आठवत असताना कास्टिंग काउचचा हा भीतीदायक अनुभव उघड केला आहे.

दिग्दर्शकासोबत करायचं होतं हे काम
एका दिलेल्या मुलाखतीत कास्टिंगकाऊचचा अनुभवाबद्दल प्रश्न तिला विचारला असता,  स्नेहाने या घटनेचा खुलासा करत याविषयी म्हटलं आहे की, ' जिथं पर्यंत कास्टिंग काउचचा प्रश्न आहे. मला हे आठवत नाही की ते कोणतं वर्ष होतं. पण मला वाटतं की, ती माझ्या ग्रेजुएशनच्या वेळेच्या आसपास आहे. एकदा मला साऊथच्या कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला तेव्हा त्याने मला एका चित्रपटाची ऑफर दिली.

हैद्राबादला जाऊन भेटायचं ठरलं
स्नेहा जैन पुढे म्हणाली, 'हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीवर आधारित गोष्ट होती. त्यांनी मला सांगितलं की तीन कपल असतील आणि त्या सर्वांच्या तितक्याच महत्त्वाच्या भूमिका असतील. मी त्यांना माझं प्रोफाइल आणि फोटो पाठवले आणि दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला की, त्यांनी सांगितलं की, तुम्हाला दिग्दर्शक आणि निर्मात्याला भेटण्यासाठी हैदराबादला जावं लागेल. मी तिथे जाण्याचं मान्य केलं. त्यांनी मला चित्रपटाची कथा, बॅनर, निर्माता आणि दिग्दर्शकाचा यासोबत माहिती देण्यास सांगितली. मी त्यांना सांगितलं की, मी माझ्या आईबरोबर जाईन.

ही अट फोनवरच ठेवा
पुढे स्नेहा म्हणाली, 'मग त्याने मला सांगितलं की, एक अट आहे की, तुला त्याच्यासोबत सेटलमेंट करावी लागेल. मी आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला सांगितलं की, ज्या दिवशी मी हैदराबादला पोहोचेन, हॉटेलची माहिती मला दिली जाईल. मी दिग्दर्शकाला भेटून करार करेन. ते मला अर्धी रक्कम देतील. त्यांनी मला पुढे सांगितलं की, मला संपूर्ण दिवस दिग्दर्शकासोबत घालवावा लागेल आणि तो जे सांगेल ते करावे लागेल. मला धक्का बसला आणि थेट त्याला सांगितलं की हे चुकीचं आहे आणि मी यासारख्या प्रोजेक्टचा भाग होऊ शकत नाही.'

स्नेहाच्या मते, नकार दिल्यानंतरही त्या व्यक्तीने हार मानली नाही. स्नेहा पुढे म्हणाली, 'तो मला सांगू लागला की, ही फार मोठी गोष्ट नाही आणि प्रत्येकजण हे करतोच. मी तिला सांगितलं की, मला प्रसिद्ध व्हायचं नाही. जर मला एखादा प्रोजेक्ट हवा असेल तर तो माझ्या प्रतिभेमुळे मला हवा आहे. एका आठवड्यानंतर त्याने मला पुन्हा फोन केला आणि मला सांगितलं की करार अद्याप खुला आहे. मी पुन्हा त्याला ओरडले आणि त्याने मला यानंतरही थांबयला सांगितलं.