कोरोनाच्या संकटात ऋषिकेश रिकामेचे 'पॉझिटिव्ह' सूर सोशल मीडियावर व्हायरल

ऋषिकेशचं गाणं थेट शेतातल्या शिवारातून 

Updated: Apr 26, 2021, 08:28 AM IST
कोरोनाच्या संकटात ऋषिकेश रिकामेचे 'पॉझिटिव्ह' सूर सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर गेलं.  कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशा परिस्थितीत मनाला पुन्हा एकदा मरगळ आली. माणूस माणसापासून दूर झाला. आपल्या गावापासून दूर झाला. (Rushikesh Rikame singer who sung song at farm goes viral on social media ) अशावेळी हिरव्या शिवारातून गाणं गाणारा गायक ऋषिकेश रिकामे सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला. 

ऋषिकेश रिकामे नाशिकमधील विंचूर गवळी गावातील तरूण आहे. गाण्याची आवड असणाऱ्या या ऋषिकेशने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शेतात गाणं रेकॉर्ड करून ऋषिकेश आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेत. या गाण्यांना डिजिटल माध्यमावर चांगलीच पसंती मिळाली आहे. 

ऋषिकेश रिकामेला संगीताची आवड त्याच्या घरातूनच मिळाली आहे. त्याच्या वडिलांनी ऋषिकेशला लहान असताना भजनाला न्यायला सुरूवात केली. अशी त्याची गाण्याची आवड जोपासली गेली. काही रिऍलिटी शोमध्ये ऋषिकेशने प्रयत्न केलाय. पण तो अयशस्वी ठरला. मात्र सोशल मीडियावर ऋषिकेशने धुमाकूळ घातला आहे. 

सध्या कोरोनाचा काळ आहे. प्रत्येकाला या परिस्थितीतून लवकर बाहेर पडायचं आहे. अनेकांनी या परिस्थितीत आपल्या अगदी जवळच्या माणसांना गमावलं आहे. ऑक्सिजन जो परमेश्वराने आपल्याला फुकट दिला. त्याची माणसाने कधीच कृतज्ञता व्यक्त केली नाही. पण या कोरोनाच्या संकट समयी ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांनी आपले प्राण गमावले अशा परिस्थितीत 'देवाविना माणसाची जिंदगानी एकटी' असंच जाणवतो. हे ऋषिकेशचं पहिलं गाणं, सोशल मीडियावर या गाण्याला खूप चांगली पसंती मिळाली. 

ऋषिकेशचे अजय गोगावले हे लोकप्रिय गायक आहेत. ऋषिकेशच्या घरचा शेती हाच व्यवसाय. आपल्या वडिलांना ऋषिकेश शेतात मदत करत असतो. त्यासोबत शिक्षणही घेत आहे. त्याने एक तेलुगु गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे.

ऋषिकेशने सोशल मीडियावर यूट्यूब चॅनल तयार केलं असून सगळे गाण्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.