RRR स्टार ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकूण थक्क व्हाल, लग्नातच केले होते 100 कोटी खर्च

दाक्षिणात्य स्टार्सची लोकप्रियता आता फक्त दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ते संपूर्ण भारतातील स्टार्समध्ये देखील प्रसिद्ध झाले. असाच एक स्टार आहे ज्युनियर एनटीआर (Junior NTR) जो आगामी चित्रपट RRR मध्ये दिसणार आहे. हिंदी पट्ट्यातही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला RRR नव्हे तर ज्युनियर NTR बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

Updated: Feb 7, 2022, 11:21 PM IST
RRR स्टार ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकूण थक्क व्हाल, लग्नातच केले होते 100 कोटी खर्च title=

मुंबई : दाक्षिणात्य स्टार्सची लोकप्रियता आता फक्त दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ते संपूर्ण भारतातील स्टार्समध्ये देखील प्रसिद्ध झाले. असाच एक स्टार आहे ज्युनियर एनटीआर (Junior NTR) जो आगामी चित्रपट RRR मध्ये दिसणार आहे. हिंदी पट्ट्यातही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला RRR नव्हे तर ज्युनियर NTR बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

तेलुगु फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलणे आणि ज्युनियर एनटीआरचा उल्लेख न करणे, असे होऊ शकत नाही. त्याचा जन्म 1983 मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. तो वयाच्या 10 व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करत आहे आणि टॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. बाल कलाकार म्हणून ज्युनियर एनटीआरचा पहिला चित्रपट ब्रह्मश्री विश्वामित्र आहे, जो त्याचे आजोबा एनटी रामाराव यांनी बनवला होता. ज्युनियर एनटीआर यांचे खरे नाव तारक आहे जे त्यांच्या आजोबांनी बदलले होते.

ज्युनियर एनटीआरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याने 2011 मध्ये लक्ष्मी प्राणथीशी लग्न केले. लक्ष्मी प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. या लग्नाची गणना साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नांमध्ये केली जाते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या लग्नात जवळपास 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लक्ष्मीने लग्नात जी साडी परिधान केली होती त्याची किंमत एक कोटी रुपये होती.

एवढेच नाही तर केवळ लग्नाच्या सजावटीवर 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले. लग्नाला सुमारे 15,000 लोक उपस्थित होते. त्यापैकी 12,000 फक्त Jr NTR चे चाहते होते. ज्युनियर एनटीआर लॅविश लाइफस्टाइल जगण्‍यासाठी प्रसिद्ध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 1100 कोटी रुपये आहे.