मुंबई : सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचं काहिदिवसांपूर्वी ब्रेकअप झालं. खुद्द सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली होती. मात्र, रिलेशनशिप संपल्यानंतर दोघंही एकमेकांचे मित्र राहतील, असं सुष्मिताने सांगितलं होतं. आता रोहमन शॉलचं इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सत्र आहे. ज्यामध्ये त्याने जीवनातून कोणते धडे शिकले हे सांगितलं.
या सत्रादरम्यान, एका युजर्सने रोहमनला विचारलं, तुम्ही या कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या जीवनाबद्दल काय शिकलात? प्रत्युत्तर देत तो म्हणाला, सर्वात मोठा धडा हा शिकायला मिळाला की, समस्या कितीही मोठी असली तरी तुमच्यात ईच्छाशक्ती असेल तर तुम्ही स्वतःच त्याचा सामना करू शकता. वेदना आहेत, आणि त्या सुरूच राहतील. फक्त हे नेहमी लक्षात ठेवा की, शेवटी तुम्हाला त्याचा फायदा होईल.
रोहमन शॉलला त्याच्या स्ट्रेंथबद्दल विचारलं असता तो म्हणाला, सत्य हे आहे की, मी स्वतःशी खोटं बोलत नाही. तुम्हाला सगळं आवश्यक आहे. कधीकधी एक विशेष प्रकारची जादू चालते. यासोबतच रोहमनने आपल्या डेब्यू प्रोजेक्टची लवकरच घोषणा करणार असल्याचेही त्याने यावेळी संकेत दिले आहेत. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, कोविड होण्याआधी मी काहीतरी शूट केलं होते. त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या सुरू आहे. मी लवकरच तुम्हाला सर्वाना याबद्दल सांगेन.
आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान, एका चाहत्याने रोहमनला विचारलं, या कोविड दरम्यान तुझा भावनिक अनुभव काय होता. मी कधी मरेन असं तुला कधी वाटलं होतं का? यावर त्याने उत्तर देत लिहीलं, जीवन आणि मृत्यू निश्चित सत्य आहे. त्यामुळे मला या प्रकारच्या कल्पनेने खूप सोयीस्कर वाटतं. खरंतर मी याचा कधीच विचार केला नाही. मी फक्त मानसिकदृष्ट्या मजबूत राहिलो.