विजय देवरकोंडाच्या 100 चाहत्यांना मनाली ट्रिप; लागू शकतो तुमचाही नंबर; वाचा संपूर्ण बातमी

जर तुम्हीही देवरकोंडाचे चाहते असाल आणि तुम्हालाही या सहलीला जायचं असेल तर तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता.

Updated: Jan 8, 2023, 11:04 PM IST
विजय देवरकोंडाच्या 100 चाहत्यांना मनाली ट्रिप; लागू शकतो तुमचाही नंबर; वाचा संपूर्ण बातमी title=

मुंबई : आज साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. चाहते मोठ्या संख्येने त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात.  मात्र विजय देवरकोंडाचा शेवटचा चित्रपट लिगर (2022) तेलुगू आणि हिंदीमध्ये वाईटरित्या फ्लॉप झाला.  मात्र नवीन वर्षात त्याला सर्व गोष्टी नव्याने सुरू करायच्या आहेत आणि चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी त्याने एक नवीन योजना आखली आहे.

विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत एक घोषणा केली आहे की,  तो आपल्या 100 चाहत्यांना सुट्टीसाठी मनालीला पाठवणार आहे. ही सहल पाच दिवसांची असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सहलीला येणारा प्रवास, राहण्याचा आणि जेवणाचा सर्व खर्च विजय देवराकोंडा स्वतः उचलणार आहेत. मोफत ट्रिपच्या चाहत्यांसाठी विजय देवरकोंडाची ही नवीन वर्षाची भेट आहे.

म्हणूनच मनालीची निवड केली
नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवराकोंडाने लिंकमध्ये चाहत्यांना विचारलं होतं की, तुम्हाला कुठे प्रवास करायला आवडेल. विजय देवरकोंडा यांनी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, बहुतेक चाहत्यांनी सांगितलं की, त्याला माऊन्टंनवर जायला आवडेल. म्हणूनच या अभिनेत्याने मनालीची निवड केली आहे. जिथे 100 निवडक चाहत्यांना बर्फाच्छादित पर्वत पहायला मिळतील आणि त्याचे हे चाहते या संपूर्ण प्रवासाचा मोफत आनंद घेऊ शकतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चाहत्यांसाठी सहलीत अनेक उपक्रमही केले जाणार असल्याचं विजय देवरकोंडाने सांगितलं. त्याची माहिती तो नंतर देईल. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहते कमेंन्ट्सचा वर्षाव करत आहेत. 

जर तुम्हीही देवरकोंडाचे चाहते असाल आणि या सहलीला जायचे असेल तर तुम्ही तुमचे नशीब आजमावू शकता. यासाठी तुम्हाला विजय देवराकोंडा यांच्या इंस्टाग्रामवर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि दिलेली  माहिती भरून तेथे उघडणारा फॉर्म पाठवावा लागेल. पण या सहलीला जाण्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे तुमच वय १८ पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे