VIDEO : 'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...'

Roger Federer on Looking Like Arbaaz Khan : रॉजर फेडररचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 14, 2024, 12:15 PM IST
VIDEO :  'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...' title=
(Photo Credit : Social Media)

Roger Federer on Looking Like Arbaaz Khan : आपण अनेकदा पाहतो की बॉलिवूड सेलिब्रिटींचे हुबेहुबे दिसणारे अनेक लोक सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात काही सेलिब्रिटी असतात जे हुबेहुबे एकमेकांसारखे दिसतात. अशात आता चर्चा आहे ती लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडरर आणि अभिनेता अरबाज खानची... खरंतर अरबाज खाननं या आधी यावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. पण रॉजर फेडररनं त्याच्या आणि अरबाजच्या हुबेहुब दिसण्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रॉजर फेडरर हा त्याच्या आणि अरबाजच्या हुबेहुब दिसण्यावर बोलताना दिसत आहे. 

अॅमेझॉन प्राइमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रॉजर फेडररनं अरबाज खानसोबतच्या 'डॉपेलगॅन्गर' वर वक्तव्य केलं आहे. व्हिडीओत रॉजर फेडरर बोलतोय की हे खरंच खूप मजेशीर आहे. सोशल मीडिया ही एक वाइल्ड प्लेस आहे आणि मला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. तर पुढे हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या अरबाज खानवर बोलताना रॉजर म्हणाला, 'मी माझा आणि अरबाज खानचा एक फोटो पाहिला होता. ज्यात आम्ही एकसारखे दिसतोय. सोशल मीडियावर लोकं काय काय शोधतात आणि त्यांना एकमेकांशी जोडतात आणि त्या तुम्हाला सतत दिसतात. हे खूप मजेशीर वाटत आणि आशा आहे की मी त्याला एकदिवस भेटेन.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, फक्त रॉजर फेडररनं नाही तर त्याच्या चाहत्यांनी देखील यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की 'फेडरर देखील अरबाज खान सरांचे चाहते आहेत. वाह काय लेजंड आहेत. दुसऱ्यानं कमेंट केली की हे एपिक आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'जेव्हा मी पहिल्यांदा फेडररला पाहिलं तेव्हा मला देखील हाच विचार आला होता. तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे आणि आज आरएफ माझ्यासाठी टेनिसची परिभाषा झाले आहेत.' 

हेही वाचा : शाहरुख, रणवीरसहीत 'या' पाहुण्यांना अंबानींनी दिलं प्रत्येकी 2 कोटींचं घड्याळ

2023 मध्ये अरबाज खानच्या एका जाहिरातीत त्याला टेनिसपटूच्या भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी या जाहिरातीमुळे सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. अरबाज खान हा रॉजर फेडररचा खूप मोठा चाहता आहे. आता रॉजर फेडररच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांना रॉजर फेडरर आणि अरबाज खानची भेट कधी होते याची प्रतिक्षा आहे.