वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशची पोस्ट वाचून तुमचंही मन गहिवरेल!

Ritiesh Deshmukh Emotional Post: रितेश देशमुख हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. आज विलासरावांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं रितेशनं एक भावनिक पोस्ट (Vilasrao Deshmukh Birth Anniversary) शेअर केली आहे. यावेळी त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 26, 2023, 07:47 PM IST
वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशची पोस्ट वाचून तुमचंही मन गहिवरेल!  title=
फाईल फोटो

Ritiesh Deshmukh Emotional Post: वडील हे वडील असतात. त्यांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या मायेची उब ही आपल्याला ते आपल्या जवळ असतात तेव्हा आणि नसतात तेव्हा, कायमच आठवत राहते. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याची अवस्थाही काहीशी अशीच आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रितेश देशमुख हा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा आहे. 2012 साली विलासरावांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांची जयंती आहे. आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत रितेशनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल हे नक्की. 

रितेश देशमुखनं आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं इन्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यानं आपल्या दोन्ही मुलांचा फोटो विलासरावांच्या (Ritiesh Deshmukh Post on Father) पुतळ्यासोबत शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''माझ्या सर्वात कठीण समयी... जेव्हा मला असहय्य वाटतं, काहीच करू शकत नाही, पराभूत झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी विचार करतो की मी कुणाचा मुलगा आहे. या एकाच विचाराने मी पुन्हा एकदा जग जिंकण्यासाठी तयार होतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा... तुमची दररोज आठवण येते.''

हेही वाचा - सस्ती चिजोंचा शौक नही! न्यासा देवगणच्या बेस्ट फ्रेंडचं नेटवर्थ ऐकून बसेल धक्का...

यावेळी या पोस्ट खाली चाहत्यांच्या नानाविध कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी यावेळी विलासरावांची आठवण काढली आहे. 'साहेब तुम्हाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!' अशी कमेंट त्यांच्या चाहत्यांनी केली आहे. तर एका युझरनं रितेशची आणि रितेशच्या मुलांची स्तुती केली आहे. त्यानं म्हटलंय की, 'वयापेक्षा संस्कार मोठे आहेत या दोघांचे'. तर अनेकांनी 'साहेब' म्हणत विलासरावांची आठवण काढली आहे. रितेश हा आपल्या वडिलांच्या बाबतीत हळवा आहे. तो अनेकदा विलासरावांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. त्याहून आपल्या मुलांसहही त्यांचा फोटो पोस्ट करतो. त्याच्या या फोटोवर चाहत्यांच्या कायमच कमेंट्स येताना दिसतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या या पोस्टनंही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टला प्रचंड लाईक्सही आले आहेत. मागे एकदा विलासरावांच्या कोटसोबत रितेशनं एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला होता तेव्हा त्याच्या या व्हिडीओलाही प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स आले होते. रितेश आणि जेनेलिया यांचा 'वेड' हा चित्रपट (Ritiesh and Genelia) या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला होता. आता नेटकऱ्यांना उत्सुकता आहे त्यांच्या आगामी नव्या चित्रपटांची.