'या' चित्रपटानंतर रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरी सुरु

दोघांनी एकाच चित्रपटातून करियरची सुरुवात केली.

Updated: Aug 5, 2019, 07:53 PM IST
'या' चित्रपटानंतर रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरी सुरु title=

मुंबई : बॉलिवूडमधील यशस्वी जोडप्यांच्या यादीत रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीला नेहमीच पसंती मिळत असते. जेनेलिया आज तिचा वाढदिवस साजरा आहे. अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलियाच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

जेनेलिया डिसूजाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ मध्ये मुंबईत झाला. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये करियची सुरुवात केली. या चित्रपटातून तिने रितेश देशमुखसह स्क्रिन शेअर केली होती. 

योगायोगाची गोष्ट म्हणजे, 'तुझे मेरी कसम' या चित्रपटापासून या दोघांनी २००३ मध्ये एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणि याच चित्रपटातून दोघांच्या नात्याची सुरुवात झाली. या दोघांच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमेस्ट्रीला चाहत्यांकडून पसंती मिळत असते. दोघेही २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले. 

रितेश आणि जेनेलिया यांनी २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम', २००४ मध्ये 'मस्ती', २०१२ मध्ये 'तेरे नाल लव हो गया' आणि २०१४ मध्ये 'लय भारी' या चित्रपटातून स्क्रिन शेअर केली आहे.

 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

२०१९ मध्ये दोघांनी त्यांच्या सहजीवनाची ७ वर्ष पूर्ण केली आहेत. जेनेलिया आणि रितेश दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रितेश आणि जेनेलिया यांना दोन मुलंही आहेत.