नवी दिल्ली : आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते ऋषी कपूर हे आता पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्यावर ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन हल्ला चढवला आहे.
अभिनेते ऋषी कपूर यांनी केवळ गुरमीत राम रहीम यांच्यावर टीका केलेली नाहीये. तर, त्यांनी इतरही धर्मगुरुंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऋषी कपूर यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे.
आपल्या ट्विटरवर ऋषी कपूर यांनी लिहीलं आहे की, "चोर-लुटेरे आणि दगाबाज बाबांवर लोकांची अंधभक्ती आहे. सरकारने या ढोंगी बाबांवर कडक कारवाई करायला हवी. सुखविंदर कौर उर्फ राधे माँ, गुरमीत, आसाराम, नित्यानंद हे सर्व क्रिमिनल्स आहेत."
Frauds.Blind faith in con people.Government must punish these fraudsters.Sukhwinder Kaur(Radhema)Gurmeet,Asaram,Nityananda.All Criminals! pic.twitter.com/1Sm2gqagBq
— Rishi Kapoor (@chintskap) August 25, 2017
गुरमीतला दोषी ठरविल्यानंतर त्याच्या समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली आहे. याच संदर्भात अभिनेता ऋषी कपूर यांनी ट्विट करत गुरमीत समर्थकांवर टीका केलीय. न्यायालयाने गुरमीतला दोषी ठरवलं आणि त्यानंतर त्याच्या समर्थकांनी जाळपोळ, तोडफोड करण्यास सुरुवात केली.
ऋषी कपूर ट्विटरवर म्हणतात, "डेराची सर्व संपत्ती विकली पाहीजे आणि झालेल्या नुकसानाची भरपाई केली पाहीजे. गुरमीतच्या समर्थकांना लाज वाटली पाहीजे.
Attach all Dera properties and sell them to compensate the national loss by arson and vandalism. Shame Gurmeet followers. No respect for you pic.twitter.com/Tgl03SYTpt
— Rishi Kapoor (@chintskap) August 25, 2017
काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या ट्विट्सला गांभीर्याने घेतलं नाही पाहीजे. मी माझ्यासाठी ट्विट करतो असेही त्यांनी म्हटलं होतं.