वेब सीरीज मध्ये बोल्ड भूमिका करण्यावर रिंकू राजगुरुचं स्पष्ट उत्तर

सैराट फेम रिंकू राजगुरु अनेक चित्रपटात काम करताना दिसत आहे. तिने वेब सीरीजमध्ये ही काम केलंय.

Updated: Jul 17, 2022, 08:27 PM IST
वेब सीरीज मध्ये बोल्ड भूमिका करण्यावर रिंकू राजगुरुचं स्पष्ट उत्तर title=

मुंबई : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने या सिनेमातून या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर आली. तिने हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये ही काम केलं. (Rinku Rajguru on Bold Content of Web series)

रिंकू राजगुरुने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. तिने म्हटलं की,'नेहमीच कुठंतरी दिसावं असं वाटत नाही. अजूनही मी अबोल आहे. 'सैराट', 'कागर', 'मेकअप', 'झुंड', 'आठवा रंग प्रेमाचा' हे सिनेमे आणि सीरीज केल्यानंतर ही आपल्याकडे प्रेक्षक त्याच चौकटीतून पाहतात आणि तशाच कामाची अपेक्षा ठेवतात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

सैराट सिनेमात एकदाम बिनदास्त मुलीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरुने एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली. एकीकडे ओटीटीवर दररोज अनेक वेब सीरीजमध्ये बोल्ड कंटेंट वाढत असताना रिंकू राजगुरु मात्र आपण याबाबत कम्फर्टेबल नसल्याचं म्हणते. त्या वाटेला मी जाणार नाही असं ही तिने म्हटलंय.