मुंबई : जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) लग्न बंधनात अडकले आहेत. नुकतंच त्यांच लग्न झालं आणि त्यांनी मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिली. (Richa Chadha Ali Fazal Wedding) यावेळी अनेक सदस्यांनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नानंतर #RichaChadha आणि #AliFazal देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. त्यांचे चाहते आनंदीत आहेत तर दुसरीकडे काही लोक त्यांच्या लग्नावर मूर्खपणे काहीही बोलत आहेत. या प्रेमाला त्यांनी लव्ह जिहादचे (Love Jihad) नाव दिले आहे. लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रिचाला 'बुरखा हिजाब मुबारक हो'च्या शुभेच्छा देत आहे.
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नानंतर लोक अशा काही गोष्टी बोलत आहेत की, जर तुमचा प्रेमावर विश्वास असेल तर या गोष्टी ऐकून तुमचे रक्त खळखळून निघेल. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, बुरखा हिजाब मुबारक हो रिचा. दुसरा नेटकरी म्हणाला, हे लव्ह जिहाद करणार नाही का... तिसरा नेटकरी म्हणाला, 'ते दोनं संस्कृतीनं लग्न का करू शकतं नाही..., नेहमी का फक्त इस्लाम' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आणखी एक लव्ह जिहाद लव्ह स्टोरी लवकरच येणार आहे.' (Richa Chadha Ali Fazal Wedding Love Jihad Tweet About Burka And Hijab Goes Viral Know Why)
Burka Hijab mubarak ho #RichaChadha
— Terror Free Desh (@terrorfreedesh) October 5, 2022
क्या यह लव जिहाद नहीं कहेंगे ? या फिर साजिश#lovejihaad #RichaChadha #AliFazal #wedding https://t.co/bWNGrvAcM3
— Tilak Tiwari (@TiwariTilak) October 5, 2022
If its love thn why cannt they marry with two cultures together...why its alwyz islam??
— Savenature (@savenature1995) October 5, 2022
दरम्यान, रिचा आणि अली अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. ते 'फुक्रे'च्या सेटवर भेटले होते. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. असं म्हटलं जातं की रिचानं तिच्या मनातली गोष्ट सांगितली. रिचानं प्रपोज केल्यानंतर अलीनं तिला उत्तर देण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ घेतला. तेव्हापासून हे जोडपं लिव्ह इनमध्ये राहत होतं.
रिचा आणि अली यांच्याबद्दल अशाही बातम्या आल्या होत्या की, दोघांचेही सुमारे अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम परंपरेनुसार लग्न करण्याचा विचार केला होता, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यांनी हे पुढे ढकललं.
मेहेंदीपासून रिचा आणि अलीच्या लग्नापर्यंत सर्व विधी दिल्लीत पार पडल्या. संगीत सोहळ्यात दोघांनीही जबरदस्त डान्स केला. त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले. आता लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टी होती, ज्यामध्ये हृतिक रोशन, सबा आझाद, विकी कौशल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. चाहत्यांनीही त्यांच्या आवडत्या 'भोली पंजाबन' आणि 'गुड्डू भैया'ला शुभेच्छा दिल्या.