Sushant Singh Rajput : कथित गर्लफ्रेंडची ११ तास कसून चौकशी

सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.   

Updated: Jun 19, 2020, 10:19 AM IST
Sushant Singh Rajput : कथित गर्लफ्रेंडची ११ तास कसून चौकशी title=

मुंबई : रविवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी मुंबई पोलीस त्याच्या जवळच्या व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty)कसून चौकशी करण्यात आली. गुरूवारी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. मुंबई पोलिसांनी जवळपास ११ तास रियाची चौकशी केली. सुशांत आणि रिया एका रोमांटिक आणि विनोदी चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार होते. 

वांद्रे पोलीस स्थानकात जबाब नोंदवल्यानंतर रियाने माध्यमांसोबत संवाद साधलेला नाही. दरम्यान सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याची मॅनेजर श्रृती मोदी आणि पीआर अंकिता नेहलानीची देखील चौकशी करण्यात आली आहे. 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. सुशांत याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली  आहे.

सुशांतच्या घरी स्वयंपाक करणारी, घरकाम करणारा आणि त्याचा मॅनेजर, सुशांतची बहीण आणि त्याचा मित्र अभिनेता महेश शेट्टी या सर्वांचे जबाब पोलिसांनी सोमवारी नोंदविले. आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतने शेवटचा फोन शेट्टी याला केला होता, मात्र त्याने तो उचलला नाही, असे पोलीस चौकशीत सांगण्यात आले आहे.