बॉक्सऑफिवर तुफान कामगिरी करत असूनही 'या' अभिनेत्याने पाहिला नाही सिनेमा

संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवर अवघ्या तीन दिव्सात 100 कोटींच्या पार गल्ला जमावणारा हा चित्रपट पाहण्याची रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. रसिकांसोबतच बॉलिवूडमधूनही या चित्रपटाची वाहवा होत आहे. रणबीर कपूर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. 

Updated: Jul 5, 2018, 05:16 PM IST
बॉक्सऑफिवर तुफान कामगिरी करत असूनही 'या' अभिनेत्याने पाहिला नाही सिनेमा title=

मुंबई : संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवर अवघ्या तीन दिव्सात 100 कोटींच्या पार गल्ला जमावणारा हा चित्रपट पाहण्याची रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. रसिकांसोबतच बॉलिवूडमधूनही या चित्रपटाची वाहवा होत आहे. रणबीर कपूर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. 

रणबीर कपूरच्या सोबतीने अभिनेता परेश रावल आणि विक्की कौशल यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. राजकुमार हिरानी दिगदर्शित 'संजू'चं बॉक्सऑफिसवरील यश पाहता या सिनेमाच्या टीमने सेलिब्रेशनदेखील केलं. मात्र या सेलिब्रेशन पार्टीमध्ये विकी कौशल मात्र नव्हता. 

विकी कौशक परदेशात  

DNA च्या मीडिया रिपोर्टनुसार, विकी कौशलने अजूनही 'संजू' हा सिनेमा पाहिला नाही. असे त्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे. विकी सध्या सर्बियामध्ये आहे. मागील महिन्याभरापासून तो 'उरी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

मनमर्जियामध्येही दिसणार विकी 

'उरी' सिनेमापूर्वी विकी अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मनमर्जिया' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विकी सोबत अभिनेता अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा यंदा 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.