सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला का? सीबीआयचं स्पष्टीकरण

काय होणार पुढे...?  

Updated: Oct 15, 2020, 07:07 PM IST
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला का? सीबीआयचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील वातावरण चांगलचं तापलं आहे. घराणेशाही, गटबाजी त्यानंतर सोमर उभा राहिला  बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा मुद्दा. दरम्यान सुशांत आत्महत्ये प्रकरणी सीबीआयकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. सीबीआयच्या सांगण्यानुसार सुशांत आत्महत्ये प्रकरणी तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अद्यापही काही मुद्द्यांमधील तथ्य समोर आलेलं नाही. त्यामुळे सीबीआयची शोध मोहिम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय करत असलेली चौकशी पूर्ण झाल्याची बाब समोर आली होती. सांगण्यात आलं होतं की,  सीबीआयला याप्रकरणात कोणतेही कट कारस्थान आढळले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने आपली चौकशी पूर्ण केली असून पटणाच्या सीबीआय कोर्टात यासंदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने ८ ऑक्टोबरला सुशांतच्या बहिणीचे पती आणि फरीदाबादचे आयुक्त ओ.पी. सिंह आणि  बहीण नीतू यांची नंतर दुपारी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सीबीआयकडून सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे सीबीआयला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या होती असा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण पुढे येत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.