मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह नुकतेच लग्न करून मुंबईत परतले आहेत. पद्मावत स्टार दीपवीरचं 14 आणि 15 नोव्हेंबरला कोंकणी आणि सिंधी पद्धतीनी लग्न झालं. 21 नोव्हेंबरला दीपवीर बंगलुरू आणि 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन आहे.
दीपवीरच्या लग्नानंतर रवीना टंडनने एक खुलासा केला आहे. रवीना म्हणते की, हे गुपित रणवीरला माहित आहे की नाही माहित नाही पण हे कळल्यावर त्याला नक्की आनंद होईल यात शंका नाही. रवीनाने दीपिका - रणवीरला ट्विटरवर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे गुपित शेअर केलं.
रवीनाने रणवीर सिंहचं ट्विट रिट्विट करून सांगितलं की, विश्वास ठेवा, मी आज खूप खूष आहे. रणवीर तुला मी एक सिक्रेट सांगते. दोन वर्षाअगोदर एका प्रवासात मी आणि दीपिकासोबत होते. तेव्हा दीपिकाने मला सांगितलं होतं की, रणवीरसोबत मला अगदी घरासारखं वाटतं. रणवीरसोबत मी खूप कम्फर्ट असते. रवीनाने पुढे लिहिलं की, लग्नाच्या या फोटोत मी हे सगळं बघत आहे. ईश्वर या दोघांना खूप आनंद देवो ही प्रार्थना तिने केली आहे.
Touch wood ! Soo happy! letting you in a secret @RanveerOfficial ,on a long chatty flight with @deepikapadukone a couple of years ago,she said “Ranveer makes me feel I’m home “ I’ll never forget those words,and truly she looks like she’s Home.Godbless you both https://t.co/ahSLnAmSIR
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 20, 2018
रणवीर आणि दीपिका यांनी लग्न अतिशय खाजगी ठेवलं होतं. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला काही दिवस उलटल्यानंतर अखेर या नवविवाहित जोडीने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केला. सुरुवातीला लग्नातील फक्त दोनच फोटो शेअर करणाऱ्या दीप-वीरने मंगळवारी इतरही बरेच फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं.