मुंबई : लैंगिक अत्याचाराचा आपल्याला थेट अनुभव आला नसला तरी सध्या ऐकू येत असलेल्या विविध घटना ऐकून आपला संताप होतो असं मत अभिनेत्री रविना टंडनने व्यक्त केलं आहे. आपला व्यावसायिक छळ झाला असल्याने या घटनातील दुःख आपल्याला चांगलेच माहिती आहे असंही रविना म्हणाली.
काही महिला पत्रकारांनी आपली छबी खराब केल्याचंही सांगायला रविना विसरली नाही. मात्र आपला लैंगिक छळ झाला नाही, प्रयत्न झाला असता तर आपणही त्यावर कठोर प्रत्युत्तर दिलं असतं असं रविना म्हणाली.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. तनुश्रीच्या आरोपानंतर मीटू चळवळ सुरु झाली आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप झाले. बॉलिवूड ते राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात महिलांनी आरोप केले. #MeToo चळवळीला अनेकांकडून पाठिंबा मिळत आहे. पण या चळवळीमुळे अनेकांचा खरा चेहरा लोकांसमोर येत आहे.