शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरला झी गौरव 2020 कडून अपेक्षा

लोकप्रिय अवॉर्ड शो 'झी गौरव'

Updated: Mar 11, 2020, 04:10 PM IST
शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरला झी गौरव 2020 कडून अपेक्षा  title=

मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२० पुरस्काराची नामांकनं नुकतीच एका दिमाखदार सोहोळ्यात जाहीर करण्यात आली. झी गौरव नॉमिनेशन पार्टीची उत्सुकता प्रत्येक कलाकाराला असते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातील परीक्षक संजय जाधव यांनी केलं.

तसेच यंदा नामांकन सोहोळ्याची थिम ‘वायब्रण्ट सॉलिड कलर्स’ अशी होती. या थीमला अनुसरून रेड कारपेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली. 'सॉलिड कलर्सच्या' थीममध्ये कलाकारांनी त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला.

प्रेक्षकांनी शेवंतावर जसं प्रेम केलं. तसंच माझं नवं नाटक 'इब्लिश'वर देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करावं. जुई हे कॅरेक्टर मी या नाटकात साकारत आहे. या भूमिकेला देखील नॉमिनेशन्स मिळावं अशी भावना शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेअर केली आहे. अपूर्वाने रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अण्णा आणि शेवंताच अनोखं नात या मालिकेतून समोर आलं. शेवंताने आपल्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. आता तिचं नवं नाटक 'इब्लिश' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

या नामांकन सोहळ्यात सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, मकरंद देशपांडे, अपूर्वा नेमळेकर, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अभिज्ञा भावे, अतुल परचुरे, उषा नाडकर्णी आणि मराठी सिने आणि नाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.