वयाच्या 19 व्या वर्षीच झालेला रश्मिकाचा साखरपुडा, पुढे इतकं वाईट घडलं की... 

रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Updated: Jan 13, 2022, 01:32 PM IST
वयाच्या 19 व्या वर्षीच झालेला रश्मिकाचा साखरपुडा, पुढे इतकं वाईट घडलं की...  title=

मुंबई : टॉलिवूड इंडस्ट्रीतील तरुण आणि हॉट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रश्मिकाने अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी नॅशनल क्रश हा टॅग आपल्या नावे केला होता. तसंच, अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी लाईमलाईटमध्ये असते.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदाना ही खूप ओपन माइंडेड असणारी अभिनेत्री आहे. किरिक पार्टीच्यावेळी मंदानाने तिचा सहकलाकार रक्षित शेट्टीला डेट करण्यास सुरुवात केली आणि 3 जुलै 2017 रोजी तिच्या मूळ गावी विराजपेट येथे एका खाजगी समारंभात या कपलने साखरपूडा केला होता. मात्र, या कपलने सप्टेंबर 2018 मध्ये कॉम्पिटेबल इश्यूचं कारण देत हा साखरपूडा मोडला.

मात्र, नंतर रश्मिकाने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत त्यांच्या नात्याबद्दल लिहिलं की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. रक्षितला किंवा मला इतर कोणालाही ट्रोलिंगला जावं लागू नये. अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. रक्षितनेही नंतर सांगितलं की, प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट असतो. यातून मला खूप काही शिकायला मिळालं.

रश्मिकाने 2014 मध्ये क्लीन अँड केअर्स फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकली. रश्मिकाने तिचं शालेय शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमधून केलं आहे. त्यानंतर तिने एमएस रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. रश्मिकाच्या 'डियर कॉम्रेड' चित्रपटाचा को-स्टार आणि साऊथचा सुपरहिट अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबतच्या डेटच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सतत येत आहेत. रश्मिकाने सांगितलं एका मुलाखतीत सांगितलं की, तिला एकटं राहायला आवडतं. तर विजय म्हणतो की तो त्याचं नातं गुप्त ठेवण्यास प्राधान्य देतो.