मुंबई : भारतातील प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहने नवीन लॅम्बोर्गिनी उरूस कार खरेदी केली आहे. लॅम्बोर्गिनीच्या लाइन-अपमधील उरुस सध्या सर्वाधिक विकली जाणारी गाडी आहे. Lamborghini Urus SUV ची एक्स-शोरूम किंमत Rs 3.15 Cr पासून सुरू होते आणि Pearl Capsule Edition साठी Rs 3.43 Cr (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. उरुस व्यतिरिक्त, बादशाहकडे ऑडी Q8 आणि रोल्स रॉयस राईथ देखील आहे.
कंपनीच्या माहितीनुसार ऑल-व्हील-ड्राइव्ह उरुस केवळ 3.6 सेकंदात 100 किमी प्रतितास आणि 12.8 सेकंदात 0 ते 200 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. त्याचा त्याचा टॉप स्पीड 305 किमी प्रतितास आहे.
या SUV ला चार ड्रायव्हिंग मोड मिळतात - Strada, Sport, Corsa आणि Neve. अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेन्शन, अॅक्टिव्ह डॅम्पिंग, 4-व्हील ड्राइव्ह आणि 4-व्हील स्टीयरिंग सारखी वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. या एसयूव्हीमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मानक म्हणून उपलब्ध आहेत. या कारमध्ये अपडेटेड ऑप्शनल पार्किंग असिस्टन्स पॅकेज आणि इंटेलिजेंट पार्क असिस्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.
1980 मध्ये लॉन्च झालेल्या LM002 नंतर Urus ही कंपनीची दुसरी SUV आहे. लॅम्बोर्गिनी उरूस डिसेंबर 2017 मध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली होती आणि जानेवारी 2018 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला होती.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक बनला आहे ज्यांच्याकडे बहुमोल कार Lamborghini Urus (Lamborghini Urus) आहे. लॅम्बोर्गिनी उरुस एसयूव्ही बॉलीवूड स्टार्समध्येही खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच अभिनेता रणवीर सिंग आणि त्याआधी कार्तिक आर्यनने ही सुपर एसयूव्ही खरेदी केली आहे. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, उद्योगपती आदर पूनावाला आणि मुकेश अंबानी यांच्याकडे ही दमदार एसयूव्ही आहे.