दीपिकाचे हरवलेले हेअरबॅण्ड सापडले रणवीरकडे?

बॉलिवूडचं सर्वांत फेवरेट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्यातील गोड नात्यामुळे कमालीचे चर्चेत असतात.

Updated: Sep 8, 2021, 02:19 PM IST
दीपिकाचे हरवलेले हेअरबॅण्ड सापडले रणवीरकडे? title=

मुंबई : बॉलिवूडचं सर्वांत फेवरेट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्यातील गोड नात्यामुळे कमालीचे चर्चेत असतात. दोघांच्या ही स्टाईलिंगची विशेष चर्चा पाहायला मिळते. त्यात काही दिवसांपूर्वी पती रणवीर सिंगविरोधात दीपिकाने वचन तोडल्याची तक्रार केली होती.

'केबीसी 13' च्या नव्या भागात नुकतीच दीपिकानं हजेरी लावली होती, तेव्हा तिनं बिग बींकडे रणवीरची तक्रार केली. रणवीरनं वचन दिलं होतं की, आपल्याला तो रोज ब्रेकफास्ट करुन देईन. पण, आजपर्यंत असं काही झालं नाही. 

त्यात आता आणखी एक गोष्टीमुऴे ही जोडी चर्चेत आली आहे. रणवीर सिंगचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात त्याने अगदी हटके हेअर स्टाईल केली आहे. पण ही हेअर स्टाईल करण्यासाठी त्याने दीपिकाच्या वॉडरॉबमधील एक वस्तू घेतली आहे. दीपिकाचे हेअर बॅण्ड घेत त्याने हा नवा लूक केल्याची सध्या चर्चा रंगते आहे.

रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अतरंगी अंदाजामुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेतो. आता या लूकसाठी तर थेट त्याने दीपिकाची हेअर अ‍ॅक्सेसरीजचा वापर केला आहे.