रणवीरला आयुष्यातील त्या खास गोष्टीची प्रतीक्षा, पुन्हा व्यक्त केली इच्छा

नक्की कोणती आहे ती गोष्ट?  

Updated: Jan 14, 2022, 02:34 PM IST
रणवीरला आयुष्यातील त्या खास गोष्टीची प्रतीक्षा, पुन्हा व्यक्त केली इच्छा  title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग सध्या '83' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात त्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारली. चित्रपटाच्या यशानंतर रणवीरने आगामी भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'सर्कल' आणि 'सिम्बा 2' चित्रपट आहेत. चाहत्यांना देखील त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल उत्सुकता आहे. 

 'सिम्बा' चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर 2018 साली प्रदर्शित झालेल्या  'सिम्बा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड्स मोडले. आता  'सिम्बा 2' चित्रपटाबद्दल चर्चा रंगत आहे. 

 'सिम्बा 2' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार की नाही? यावर रणवीरने मौन सोडलं आहे. नुकताचं झालेल्या एका मुलाखतीत त्याने  'सिम्बा 2' चित्रपटाच्या निर्मितीबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर म्हणाला, 'देवाची इच्छा असेल तर चित्रपट नक्की रुपेरी पडद्यावर दाखल होईल. या चित्रपटाला फ्रेंचायजी करायचं आहे आणि रोहित शेट्टी असं नक्की करतील. सिम्बा ही माझी सर्वात आवडती भूमिका आहे.'

एवढंच नाही तर रणवीर पुढे म्हणाला, सिम्बा एक खोडकर आणि हुशार पात्र आहे. त्यामुळे मी देखील चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. रणवीरच्या वक्तव्यानंतर चाहत्यांच्या मनात देखील 'सिम्बा 2' चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. 

'सिम्बा 2' चित्रपटाशिवाय रणवीर 'सर्कस' आणि 'रॉकी और रानी की कहानी' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर 'रॉकी और रानी की कहानी' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.