व्हिडिओ : फॅन्ससाठी रणवीर कारवर चढला आणि...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

Updated: Aug 9, 2018, 10:22 AM IST
व्हिडिओ : फॅन्ससाठी रणवीर कारवर चढला आणि... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. खरंतर त्याची हटके स्टाईल, मस्ती आणि डान्स चाहत्यांना भावतो. आता पुन्हा एकदा रणवीरच्या मजेदार अंदाजाची झलक पाहायला मिळाली आहे. 

रणवीर सिंगचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अलिकडेच मुंबईतील एका इव्हेंटसाठी रणवीर गेला होता. तेव्हा त्याचे चाहत्यांनी त्याला घेरले आणि मग सेल्फीचा मोह कोणालाच आवरता आला नाही. चाहत्यांचा उत्साह पाहुन रणवीर सिंगही आनंदला. त्याने चक्क कारवर चढून चाहत्यांना अभिवादन केले. त्यावेळेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर koffee_with_bolly च्या इंस्टाग्राम हॅंडलने शेअर केला आहे.

तुम्हीही पाहा...

 

#ranveersingh snapped at bandra for #jackjonesx10 today  . . . بابا #رانفير_سينغ اليوم في ايفنت لافتتاح محل  . مووو معقوووله شككثثر محبووووب حتتى عند الاعلام والصحافه!! اسمعووا المصورين شلوون يصارخون ينادونه ( سيممباااا)  عشان فلممه الجاااي  ملاحظه  (اللي لابسه نظارات وتصور معاه تمثلني)  . باختصار / دخووله فخم + شكله يجنن + نفسه حلوه مع المعجبين + الضحكه طووول الايفنت مافارقت وجهه + طاقته اللي ملت المكان  . . . . #bollywood #بوليوود

A post shared by تحب بوليوود  !؟ فولو  (@koffee_with_bolly) on

अलिकडेच रणवीर सिंगने गली बॉयचे शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहे. सध्या रणवीर रोहित शेट्टीच्या सिम्बा च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात रणवीरसोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान झळकणार आहे.