रणवीर सिंग दिपीकासोबत नाही तर या मुलीसोबत घालवतोय वेळ, पाहा व्हिडिओ

 बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Apr 19, 2022, 10:57 PM IST
रणवीर सिंग दिपीकासोबत नाही तर या मुलीसोबत घालवतोय वेळ, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तो दररोज त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचबरोबर, तो त्याच्या स्टाइलिंग आणि ड्रेसिंग सेन्समुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, अभिनेत्याचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणला त्याच्यावर राग येऊ शकतो.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानलं जातं यात काहीच शंका नाही. रील लाईफ असो वा रिअल लाईफ, दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. आता रणवीरचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्याला महिला चाहत्यांनी वेढलेलं दिसत आहे आणि डान्स फ्लोरवर त्यांच्यासोबत स्टेप बाय स्टेप डान्स करत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील एका लग्नातला आहे. 

रणवीर डान्स फ्लोअरवर आपल्या महिला चाहत्यांसोबत थिरकताना दिसत आहे, मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये. तुम्ही रणवीर आणि त्याचा एक चाहता 'गल्ला गुडिया'वर नाचताना पाहू शकता. अशा प्रकारे नैन मटका केल्याने काय परिणाम होईल हे दिपीका आणि रणवीर जाणे. सध्या हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.