दीपिकाच्या स्वागतासाठी असं सजल रणवीरचं घर

पाहा हे फोटो 

दीपिकाच्या स्वागतासाठी असं सजल रणवीरचं घर  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इटलीत लग्न संपन्न झाल्यानंतर रणवीर सिंहचा बंगला अगदी एखाद्या नववधुप्रमाणे सजला आहे. हा बंगला आता नववधु दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. 

रणवीरचा बंगला हा मुंबईतील वांद्रे परिसरात असून त्याच्या या विलाचं नाव 'श्री' आहे. संपूर्ण घराला रोशनाई केली असून हे घरं आता नव्या सुनेची वाट पाहत आहे. 

दीपिका आणि रणवीर आपल्या हनीमूनकरता आता रवाना होणार आहेत. हनीमूननंतर ते भारतात येतील आणि बंगलुरू, मुंबईत असे 3 रिसेप्शन असणार आहे.

21 नोव्हेंबरला बंगलुरूमध्ये रिसेप्शन असून मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन असणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका मुंबईतील प्रभादेवीमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. या दोघांचे आगामी मोठे प्लान्स आहेत.

मुंबईतील प्राईम लोकेशनमध्ये दोघांना घरं घ्यायचं आहे. या दोघांनी घर खरेदी करण्यासाठी जवळपास 70 करोड रुपयांच बजेट ठेवलं आहे. पण आता तूर्तास रणवीर दीपिकाने घेतलेल्या स्वतःच्या घरी राहणार आहे. 

लग्नाच्या फोटोने तोडला रेकॉर्ड 

दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंनी एक नवा रेकॉर्ड रचला आहे. यांनी विरूष्काच्या लग्नाचा रेकॉर्ड देखील तोडला आहे. दीपिकाने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करताच त्याला 2 तासांत जवळपास 26 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. विरूष्काच्या लग्नाचा फोटो 15 तासांत 25 लाखांपर्यंत पोहोचला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on