अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेतील रणवीर सिंंगचा लूक रिलीज

संजय लीला भंसाळींचा बहूप्रतीक्षित सिनेमा 'पद्मावती'चे तिसरे पोस्टर आणि अल्लाउद्दीन खल्जीची भूमिका साकारणार्‍या अभिनेता रणवीर सिंगचा लूक रिलीज करण्यात आला आहे. 

Updated: Oct 3, 2017, 12:42 PM IST
अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेतील रणवीर सिंंगचा लूक रिलीज   title=

मुंबई : संजय लीला भंसाळींचा बहूप्रतीक्षित सिनेमा 'पद्मावती'चे तिसरे पोस्टर आणि अल्लाउद्दीन खल्जीची भूमिका साकारणार्‍या अभिनेता रणवीर सिंगचा लूक रिलीज करण्यात आला आहे. 

राकट, डोळ्यात रोष अशा भावनांचा अल्लाउद्दीन खल्जी पोस्टरमधून समोर आला आहे. 'पद्मावती' चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोण प्रमुख भूमिकेत तर चित्तोडचा  राजा रावल रतन सिंह ही भूमिका शाहिद कपूरने साकारली आहे. रणवीर सिंंगने ही दोन्ही पोस्टर्स ट्विटरवर शेअर केली आहेत. 

 

 

अनेक अडचणी आणि जयपूरमध्ये काही समाजाचा रोष पत्करून 'पद्मावती' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे १ डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाला रसिकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.