Ranveer Allahbadia YouTube Channels Hacked: लोकप्रिय युट्यूबर आणि Influencer रणवीर अल्लाहबादिया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल हॅक झाले असून त्याच्या चॅनलचे नाव टेस्ला असं करण्यात आलं आहे. रणवीरच्या बीयर बायसेप्स या चॅनलचे नाव बदलून @Elon.trump.tesla_live2024 असं ठेवण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर, त्याच्या युट्यूब चॅनेलवरीव सर्व व्हिडिओही डिलीट झाले आहेत.
हॅकरने रणवीरच्या दोन्ही चॅनलवरील सर्व मुलाखती आणि पॉडकास्ट डिलीट करण्यात आलं आहे. तर, त्याजागी एलॉन मस्क आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा एक जुना व्हिडिओ लावण्यात आला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर अल्लाहबादिया आणि त्यांची टीम या सायबर अॅटेकमुळं पूर्णपणे गोंळधून गेले आहेत. तसंच, युट्यूबसोबत संपर्क साधून चॅनल पुन्हा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हॅकर्सने एक बनावट लाइव्हस्ट्रीम रणवीरच्या युट्यूब चॅनेलवरुन लाइव्ह केली आहे. यात AIच्या माध्यमातून एलन मस्क दिसत आहे. तसंच, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत बोलत आहे. गुंतवणुकीनंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, अशी बतावणी करण्यात येत आहे. तसंच, लोकांना स्ट्रीमवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यासही सांगत होता. हा एक प्रकारचा स्कॅम आहे. लोकांकडून पैसे उकळवण्यात येतात. तसंच, लाखांच्या घरात फॉलोवर्स असलेल्या युट्यूबर्सना निशाणा बनवण्यात येतं.
सध्या युट्यूबने दोन्ही चॅनल्स हटवण्यात आले आहेत. जर रणवीरचे चॅनल सर्च करण्याचा प्रय़त्न केला तर युट्यूबकडून एक मेसेज आला आहे. यात म्हटलं आहे की, युट्यूबच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळं हे चॅनल्स हटवण्यात आले आहेत. तसंच, लाइव्ह स्ट्रीमिंगवर एक मेसेज येतोय की हे पेज उपलब्ध नाहीये.
रणवीरने अद्याप या सगळ्या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. चॅनल कोणी व कसं हॅक केले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. रणवीर याच्या ट्विटर (X)वरील शेवटची पोस्ट ही 14 तासांपूर्वीची आहे. या पोस्टमध्ये त्याच्या पॉडकास्टचा एक छोटासा व्हिडिओ आहे.
रणवीह अल्लाहबादियाने 22 वर्षांचा असताना त्याचं पहिलं YouTube चॅनल BeerBiceps सुरू केलं होतं. आता त्याच्याकडे जवळपास 7 युट्यूब चॅनेल आहेत. व सर्व चॅनलवर जवळपास 12 मिलियन फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता.