राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचे निधन

अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील आणि प्रसिद्ध पटकथाकार, दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज अकस्मित निधन झाले आहे.

Updated: Oct 22, 2017, 03:12 PM IST
राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचे निधन  title=

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील आणि प्रसिद्ध पटकथाकार, दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज अकस्मित निधन झाले आहे.

पहाटे ४ वाजता त्यांचे अचानक निधन झाल्याने हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये राम मुखर्जींनीदेखिल सहभाग घेतला होता. फीट अ‍ॅन्ड फाईन असलेल्या श्याम मुखर्जींचे असे अचानक जाणं अनेकांना चटका लावून गेले आहे. राम मुखर्जींच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झालेले  नाही.  

कोण होते राम मुखर्जी ?  
राम मुखर्जी हे चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी यांचे पुतने होते. हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. ‘हम हिंदुस्तानी’,‘लीडर’हे चित्रपट खास गाजले. ‘तोमार रक्ते अमार सोहाग’‘एक बार मुस्करा दो’, ‘रक्ते लेखा’,‘रक्त नदीर धारा’या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 

राम  मुखर्जींच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी राणी मुखर्जी आणि मुलगा राजा मुखर्जी आहेत.