अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय

Rani Chatterjee : राणी चॅटर्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं हा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2024, 12:41 PM IST
अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

Rani Chatterjee : लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीं पैकी एक आहे. Sabiha Shaikh मुळे लोकप्रियता मिळालेली राणी नेहमीच चर्चेत असते. अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी राणीनं तिच्या चाहत्यांना मोठा झटका दिला आहे. तिनं सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ती कधी ओटीटीवर परतणार त्याची देखील माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया राणीनं अखेर हा निर्णय का घेतला. 

राणीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ती सोशल मीडियापासून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्यात तिनं लिहिलं की 'तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की मी छोटा ब्रेक घेते. त्या मागचं कारण की मला कंटाळ आला आहे. मला हे जाणवलं की सोशल मीडियावर राहणाऱ्या सवयीला मला बदलायचे आहे. मला जेव्हा जाणवेल तेव्हा मी परत येईन. मी सगळ्यांना खूप मिस करेन आणि काही दिवसांसाठी मला या सगळ्यापासून लांब रहायचं आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राणीनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना वाईट वाटल्याचं सांगितलं. एक नेटकरी म्हणाला, 'खूप आराम कर आणि आनंदी रहा. आम्ही तुला मिस करू.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मी देखील तुला मिस करेन.' तिसरा नेटकरी म्हणाला, काही नवीन करायचं असेल तर हा सगळ्यात चांगला ब्रेक आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'राणी ब्रेक घेतल्यानंतर तुझ्या आरोग्याची काळजी घे.' तर एक नेटकरी म्हणाला, 'मला आशा आहे की पूनम पांडेनं केलं तसा हा प्रॅंक नाही.'  दुसरा म्हणाला, 'ताई, तुला हवा तेवढा ब्रेक घे.'

हेही वाचा : रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?

राणी चॅटर्जीविषयी बोलायचे झाले तर तिचा जन्म हा 3 नोव्हेंबर 1989 रोजी मुंबईत झाला होता. तर भोजपुरी इंडस्ट्रीतील राणी सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याशिवाय सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या लोकांमध्ये राणी एक आहे. राणीनं 2004 मध्ये 'ससुरा बडा पैसेवाला' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर ती छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील काम करते. त्याशिवाय त्यानं 'मस्तराम', 'वर्जिन भास्कर 2' आणि वो पहला प्यार' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.