३ नोव्हेंबरला येतायत 'रंगीले फंटर'; अखेर 'त्या' चार मित्रांचा उलगडा झाला!

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Oct 5, 2023, 07:09 PM IST
३ नोव्हेंबरला येतायत 'रंगीले फंटर'; अखेर 'त्या' चार मित्रांचा उलगडा झाला!  title=

मुंबई : सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. यामध्ये 'आत्मफ्प्लेट', 'बॉईज 4', 'सिंगल' याचबरोबर अजून बरेच सिनेमा लाईनमध्ये आहेत. याचबरोबर याच यादितला 'रंगीले फंटर' सुद्धा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. गेले अनेक दिवस या सिनेमाची जोरदार चर्चा होती. या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत होत. या पोस्टरमध्ये ४ मित्र दिसत आहेत मात्र या चौघांची नावे मात्र गुलदस्त्यात होती. 

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं होतं
 
शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट आपल्याला आगामी  'रंगीले फंटर' या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी 'रंगीले फंटर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं असून ते चार मित्र नक्की कोण आहेत? याचा उलगडा या पोस्टर मधून झाला आहे.

 उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. "रंगीले फंटर" या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन देण्यात आली असून आता दोस्तीत नक्की कसली कुस्ती होते यासाठी अजुन जरा वाट पहावी लागणार आहे. 

या चित्रपटात अभिनेता हंसराज जगताप, रुपेश बने,यश कुलकर्णी, जीवन कऱ्हाळकर या चार मित्रांसोबत अभिनेते मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, अभिनेत्री सिया पाटील, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीस येणार आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन,  नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन,  फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट नक्कीच पुरेपूर मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही.