एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला...

Randeep Hooda : रणदीप हुड्डा सध्या त्याच्या  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीपनं 26 किलो वजन कमी केलं. तर रणदीपनं यासाठी कसं डायटं केलं याविषयी सध्या चर्चा सुरु असताना अभिनेत्यानं स्वत: याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 27, 2023, 01:52 PM IST
एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला... title=
(Photo Credit : Randeep Hooda Instagram)

Randeep Hooda : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा आगामी चित्रपट वीर सावरकर यांच्यावर आधारीत अशा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला होता. रणदीपला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत करावी लागली. तर रणदीपनं या चित्रपटासाठी 26 किलो वजन कमी केल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या चित्रपटासाठी रणदीप जवळपास चार महिने फक्त खजूर आणि एक ग्लास दुधावर असल्याचे म्हटले जाते. रणदीपच्या या डायट प्लॉनवर नेटकऱ्यांच्या निगेटिव्ह रिएक्शन देखील येत आहे. अशा डायटमुळे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे. आता स्वत: रणदीप हुड्डानं त्यांच्या डायटविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. 

रणदीप हुड्डानं नुकतीच आजतक डॉटकॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत रणदीप त्याच्या डायटविषयी बोलताना दिसला. त्यावेळी रणदीप म्हणाला, 'जी बातमी आलीये, ती योग्य नाही. मला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे की अनेक लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मला तर ही भीती आहे की अशा बातम्या वाचून लोक हेच डायट फॉलो करतील. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की मी दूध आणि खजूर या डायटला फॉलो करत नव्हतो. हे खूप धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्याला चुकूनही फॉलो करू नका.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणदीप हुड्डा पुढे म्हणाला, 'ही गोष्टी खरी आहे की चित्रपटासाठी मी 26 किलो वजन कमी केलं. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना इतकं वजन कमी करण्याची गरज भासत नाही. आमच्यासारख्या कलाकारांना अशा तयारीतून जावं लागतं. माझ्यासोबत तर हे देखील झालं. जे चित्रपट तीन ते चार महिन्यात तयार व्हायला हवे होते त्यांना बनायला जवळपास एक वर्षे गेलं. या चित्रपटात्या इतक्या मोठ्या शेड्यूल्डमुळे मला जवळपास 7 महिने अंडरवेट रहावं लागलं होतं. त्या दरम्यान, माझं वजय हे 62 किलोच्या आसपास होतं. इतक्या कमी वजनामुळे मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यात म्हणजे रिकव्हरीतही बराच वेळ जात होता. त्याशिवाय अन्न पचनास देखील त्रास होत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याच डायटला फॉलो करू नका हाच सल्ला मी सगळ्यांना देईन.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणदीपनं पुढे सांगितलं की त्याला या चित्रपटा दरम्यान, वजन कमी करण्यास जी मदत होती त्यात त्याची बहीण देखल आहे. त्याची बहीण डॉक्टर अंजली हुड्डा ही इंटरनल मेडिसीन स्पेशलिस्ट आहे. त्यामुळे ती त्याला डायटमध्ये मदत करायची. त्याच्या जवळ इतके चांगले एक्सपर्ट लोक असताना त्याला खूप झाला होता. त्यामुळे कोणाच्या सल्ल्याशिवाय काही करू नका असा सल्ला रणदीपनं दिला आहे. 

हेही वाचा : 'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals

पुढे रणदीपनं त्याच्या डायट रुटीनविषयी सांगितलं. रणदीप म्हणाला, 'या दरम्यान, पैलियो डायट, इंटरमीटेंट फास्टिंग, वाइटमिन सप्लाईज, त्यात पाच दिवसात मला 6 ते 7 किलो वजन कमी करायचं होतं. या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत. त्या सगळ्या मी एक्सपर्टच्या निदर्शनात केल्या आहेत. त्यात ही अफवा आहे की मी फक्त दूध आणि खजूर खाऊन वजन कमी केलं. मी फक्त खजूर खात नव्हतो, तर मी अंडी, चीले, नट्स आणि डार्क चॉकलेट्स सारख्या अनेक गोष्टींचे सेवन केले. त्यात आम्ही एक दिवस माझा चीट डे देखील ठरवला होता.'