मुंबई : बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काही दिवसांपूर्नीच विवाहबंधनात अडकले आहेत. त्या दोघांनीही अगदी कमी लोकांच्या उपस्थीतीत लग्न पार पाडलं. आता या दोघांच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत. जे खूपच ट्रेंड करत आहेत. आलियाची साधी-सरळ शैली सगळ्यांनाच आवडली आहे. ज्यामुळे तिचा लग्नाचा लूक देखील व्हायरल होत आहे. यासोबत त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे ती, आणखी एका कारणामुळे.
असे सांगितले जात आहे की, रणबीरने लग्नामध्ये एका कॉन्ट्रॅक्टवर साईन केले होते. आता हा कॉन्ट्रॅक्ट कोणता आहे आणि असं नक्की आलिया आणि रणबीरच्या लग्नात काय ठरलं असेल. असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी फिरू लागली आहे.
खरंतर, हे सर्व रणबीर आलियाच्या लग्नात शूज चोरण्याच्या समारंभात घडले. खरंतर लग्नात नवरदेवाचे शूज चोरण्याचा प्रकार सर्रास केला जातो, त्यामुळे रणबीरही याला चुकलेला नाही. परंतु त्याचे शूज त्याला परत देण्यासाठी त्याच्या मेहुणींनी त्याच्याकडे11 कोटींची मागणी केली.
आता रणबीर कितीही श्रीमंत असला तरी फक्त शुजसाठी 11 केटी देणं हे त्याही पटलेलं नाही. अखेर त्याने 1 लाख रुपयांचा चेक देऊन आपले शुज कसे-बसे परत मिळवले.
खरंतर आपले शुज परत मिळवण्यासाठी रणबीरणं 1 लाख रुपये दिले असले तरी, त्याने आपल्या मेहुणींसोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन केला, ज्यामध्ये त्याने 12 लाख रुपये त्यांनी देणार असल्याचे सांगितले, तेव्हा कुठे जाऊन रणबीरला त्याचे शुज परत मिळाले.
रणबीर कपूरने बुट लपवण्याच्या समारंभात आपल्या मेहुणींना 12 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. यासाठी त्याने आपल्या मेहुणींसोबत कॉन्ट्रॅक्ट देखील साईन केला आहे, ज्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये रणबीर कपूर हातात एक लेटर घेऊन, ज्यावर लिहिले आहे, 'मी सर्व मेहुण्यांना 12 लाख देण्याचे वचन देतो, रणबीर... आलियाचा नवरा.'