Ranbir Kapoor ने शेअर केलं 'बेडरूम सिक्रेट'; म्हणाला, "आलिया आणि मी रोज रात्री..."

रोज रात्री Alia आणि Ranbir काय करतात? खुद्द रणबीरने सांगितलं बेडरूम सिक्रेट!

Updated: Sep 21, 2022, 08:49 PM IST
Ranbir Kapoor ने शेअर केलं 'बेडरूम सिक्रेट'; म्हणाला, "आलिया आणि मी रोज रात्री..." title=

Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) हे बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जातात. या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी नव्या आयुष्यातील नव्या इंनिंगला सुरूवात  (Alia Ranbir Wedding)  केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच दोघांचा Brahmastra सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाना दिसत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी फिरताना दिसला होता. अशातच रणबीरने एक खुलासा केला आहे. (Ranbir Kapoor shares bedroom secret Said Alia and I every night creating the story of the Brahmastra Part 2 and Part 3 are  movie)

एका मुलाखतीच्या वेळी रणबीर कपूरने आलिया भट्ट आणि आर्यन मुखर्जीच्या समोर बेडरूम सिक्रेट शेअर केलं. रणबीरने सिक्रेटचा खुलासा केल्यानंतर आलियाने देखील होकार देत त्याला साथ दिली. यावेळी दोघे आर्यनकडे पाहून हसायला देखील लागले.

काय म्हणाला रणबीर ?

"रोज रात्री मी आणि आलिया सोबत बसून ब्रम्हास्त्र पार्ट 2 आणि ब्रम्हास्त्र पार्ट 3 वर बोलत असतो", असं रणबीर म्हणाला. ब्रम्हास्त्र पार्ट 2 आणि ब्रम्हास्त्र पार्ट 3 मध्ये काय होईल? आम्ही या सिनेमाची कहाणी तयार करत असतो, असं रणबीर म्हणाला.

आलिया काय म्हणाली?

रणबीरने बेडरूम सिक्रेट शेअर केल्यानंतर आलियाने देखील हसत पुढील गोष्ट सांगितली. रोज रात्री आम्ही सिनेमाची कहाणी तयार करत असतो आणि कहाणी तयार झाल्यानंतर आम्ही आर्यनला फोन करून ती ऐकवतो, असं आलियाने सांगितलं.

 

दरम्यान, एका संभाषणात आलियाने तिच्या प्रेमळ पतीसोबतच्या नातेसंबंधाबद्दल मोकळेपणानं सांगितलं होतं. 'आमच्या दोघांचेही प्रेम खूप अनोखं आहे', असं आलियाने म्हटलं होतं.