मुंबईत उभारली अयोध्या! रणबीरच्या 'रामायणाची' शुटिंग सुरू, सेटचा पहिला फोटो लीक

Ramayana Shoot First Photo: रामायण चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो समोर आला आहे. मुंबईत अयोध्या शहर उभारणार आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 4, 2024, 01:00 PM IST
मुंबईत उभारली अयोध्या! रणबीरच्या 'रामायणाची' शुटिंग सुरू, सेटचा पहिला फोटो लीक  title=
Ranbir Kapoor Ramayana Shooting Has Start First Photo From The Set went viral

Ramayana Shoot First Photo: अॅनिमलनंतर रणबीर कपूर बहुचर्चित चित्रपट रामायणात दिसणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी हे भारतातील रामायणावर चित्रपट बनवत आहेत. रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर, सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहेत. त्याव्यतिरिक्त यश, लारा दत्ता, सनी देओलदेखील या चित्रपटात झळकणार आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आलेले आहे. ते पाहून रामायणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षाकांची उत्सुकता वाढणार आहे. या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली आहे. 

रामायण चित्रपटाचे शुटिंग मुंबईतच होणार आहे. त्यासाठी मुंबईत 11 कोटी रुपये खर्चुन सेट बनवण्यात येत आहे. गुरुकुलचा सेट बनवण्यात आला आहे. या सेटला अयोध्येचे रुपही देण्यात आले आहे. मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये. रामायण तीन भागांमध्ये प्रदर्शित होऊ शकते. पहिला भाग प्रभू श्री रामाची युवावस्था आणि सीता माता यांच्यासोबत विवाह यावर केंद्रीत आहे. तसंच, सीता मातेच्या अपहरणानंतर पहिला भाग संपेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, साउथ स्टार यश चित्रपटात रावणाच्या भूमिकेत झळकू शकतो, अशी चर्चा आहे. तर, सनी देओल पवनपुत्र हनुमानाची भूमिका साकारु शकतो, अशीही चर्चा आहे. मात्र, दिग्दर्शक नितीन तिवारी यांनी अद्यापही नावांच्या चर्चेवर अधिकृत माहिती दिली नाहीये. मात्र, समोर आलेल्या लिस्टमधील नावे जवळपास निश्चित झाली असल्याचे बोललं जात आहे. या लिस्टमध्ये सनी देओल यांच्याव्यतिरिक्त बॉबी देओल, विजय सेतुपती यांचेही नाव सामिल आहे. रावणाच्या भूमिकेत सुपरस्टार यश दिसणार की विजय सेतुपती हे देखील अद्याप निश्चित्त झालेले नाहीये. तर अमिताभ बच्चन यांचीदेखील छोटीशी भूमिका असू शकते अशी चर्चा आहे.

रामायण चित्रपटासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली आहे. आवाजापासून ते बॉडी पॉश्चरपर्यंत सर्व लहान-सहान गोष्टींसाठी रणबीरने खूप मेहनत केली आहे. रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या सिनेमाची सगळीकडे उत्सुकता आहे. आता या चित्रपटाच्या सेटचे फोटोही लीक झाले आहेत. रणबीरही त्याच्या आवाजावर खूप मेहनत करत आहे. चित्रपटासाठीची हे मेहनत आणि प्रक्रिया रणबीर मनापासून एन्जॉय करतोय, असं त्याने एकदा मुलाखतीत म्हटलं होतं.