तापसी पन्नूने गुपचूप उरकले लग्न; तब्बल 12 दिवसांनंतर समोर आला लग्न सोहळ्याचा व्हिडिओ

Taapsee Pannu Wedding Function: तापसी पन्नू हिने उदयपूरमध्ये गपचुप लग्न केल्याची चर्चा असतानाच आता तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 4, 2024, 12:12 PM IST
तापसी पन्नूने गुपचूप उरकले लग्न; तब्बल 12 दिवसांनंतर समोर आला लग्न सोहळ्याचा व्हिडिओ title=
Taapsee Pannu Wedding Sangeet Dance Viral Video with Mathias Bo

Taapsee Pannu Wedding Function: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू हिने मार्च महिन्यात गुपचुप लग्न उरकल्याची चर्चा आहे. आता तापसीच्या लग्न सोहळ्यातील काही क्षण समोर आले आहेत. अभिनेत्रीने तिच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत सात फेरे घेतले आहेत. या लग्न सोहळ्याचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, तापसीने अद्यापही या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाहीये. ना त्यांचा एखादा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आता तापसीच्या संगीत नाइट्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा शरारा परिधान केला आहे. तर, ती मॅशियाससोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. 

इन्संट बॉलिवूड नावाच्या इन्स्टाग्रामवर तापसीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत तापसीने पांढऱ्या रंगाच्या सफेद शरारामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. संगीत परफोर्मन्ससाठी तापसीने बॉलिवूडचे नव्हे तर एक इंग्रजी गाणे निवडले आहे. दोघांनीही त्यांच्या संगीत नाइट्ससाठी जस्ट द वे यु आर या गाण्यावर डान्स केला आहे. तापसीच्या या संगीत सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित होते. 

तापसीने अद्यापही तिच्या लग्नाची घोषणा केली नसली तरी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. लाल रंगाच्या वधुच्या वेशात तापसी खूपच सुंदर दिसत होती. तर मॅशियसदेखील शेरवानीमध्ये खूपच सुंदर दिसत होता. तापसीचा वधुच्या वेशात एन्ट्री घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

मार्च 2024च्या अखेरीस तापसी पन्नूने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. व्हिडिओत तापसी तिच्या मैत्रिणींसह वधुच्या वेशात एन्ट्री घेताना दिसत आहे. तर, सोनेरी रंगाची बुट्टी असलेल्या लाल रंगाच्या लेंहग्यात खूप सुंदर दिसत होती. तापसी लग्न मांडवात पोहोचल्यानंतर मॅशियसने तिला मिठी मारली, असा व्हिडिओ समोर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तापसी पन्नूने उदयपूरमध्ये लग्न केल्याची चर्चा आहे. सग्नाच्या 12 दिवसांनंतर तापसीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे. तापसीच्या या सिक्रेट वेडिंगने अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत. पंजाबी स्टाइल वधु झालेल्या तापसीच्या लुकही चर्चेत आहे. आता चाहते तापसीच्या लग्नाचे फोटो कधी येताहेत, याची वाट पाहत आहेत.