मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडमधील चर्चेतली जोडी बनली आहेत. या दोघांच्याही लग्नाविषयी बऱ्याच चर्चा होत असतात. असं म्हटलं जातंय की, या वर्षाच्या अखेरीस रणबीर आणि आलिया देखील लग्न करणार आहेत. कपूर परिवाराने देखील लग्नाची पूर्णपणे तयार केली आहे असं म्हटलं जात आहे की, सध्या रणबीरच्या नवीन घराच्या इंटिरीयरचं काम सुरू आहे. आलिया आधी रणबीर कपूर त्याची बेस्ट फ्रेंड कतरिना कैफला डेट करत होता. कतरिनाच्या आधी त्याच्या आयुष्यात दीपिका पदुकोण होती. पण आता एक रंजक माहिती समोर येत आहे. या सगळ्यांच्या आधी रणबीर कपूरच्या आयुष्यात आणखी एक मुलगी होती, जी नंतर त्याच्याच एका मित्राची पत्नी झाली.
अवंतिका मलिक एकेकाळी रणबीरची गर्लफ्रेंड होती
एका वृत्तामध्ये रणबीर कपूरच्या लव्ह लाइफविषयी माहिती दिली आहे. अहवालानुसार रणबीर एकेकाळी अवंतिका मलिकला डेट करायचा. अवंतिकाने नंतर आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानसोबत लग्न केलं. मात्र, आता इम्रान आणि अवंतिका हे कपल 2019मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
अवंतिकाने इम्रान खानशी केलं लग्न
रणबीर कपूर आणि इम्रान खानदेखील एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांच्या वयात फक्त 1 वर्षाचे अंतर आहे. असं म्हटलं जातं की, रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नंतर काही कारणांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर इम्रान अवंतिकाच्या आयुष्यात आला. अवंतिका आणि इमरानने 2011मध्ये लग्न केलं. दोघांनाही एक मुलगी आहे. मात्र, आता अवंतिका आणि इम्रान यांनी घटस्फोट घेतला आहे.
कतरिना कैफ आणि दिपीका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरचं नाव आलिया भट्टसोबत जोडलं जावू लागलं होतं. कतरिना आणि आलिया जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघांची मैत्री नेहमीच चर्चेत असते. आलिया आणि दीपिकादेखील खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. रणबीर कपूरच्या बाबतीत एक मोठा ट्विस्ट तेव्हा आला. जेव्हा त्याने 2016-2017 मध्ये कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2018 मध्ये आलिया भट्टला डेट करायला सुरुवात केली. या बातमीने त्यावेळी सर्वांना चकित केलं. मात्र, आता या वर्षाच्या अखेरीस रणबीर आणि आलियाचं लग्न होईल अशी अपेक्षा आहे.