मुंबई : पॉप्यूलर सिंगर आणि पॉपस्टार रिहाना आपलं मॅटरनिटी फॅशन गोल्सने नवीन फॅशन ट्रेण्ड सेट करत आहे. अनेकदा ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. तिचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. तिचे फोटो हॉलिवूडचे टॉक ऑफ द टाऊन बनले आहेत. आता बेबी बंप फ्लॉन्ट करणाऱ्या रिहानाच्या होणाऱ्या मुलांचं जेंडर देखील रिवील झालं आहे. ती मुलीला की मुलाला जन्म देणार याचं गुपित तिच्या शॉपिंग बॅगने ओपन केलं आहे.
बाळासाठी खरेदी केला ऑरेंज ड्रेस
रिहानाला लॉस एंजेलिसमध्ये रिटेल स्टोरमध्ये शॉपिंग करताना स्पॉट केलं गेलं. जिथे ती बेबी क्लोथ सेक्शनमध्ये बेबी गर्लचे कपडे सिलेक्ट करताना दिसली. यावेळी ती ऑरेन्ज रफल्ड ड्रेस खरेदी करताना स्पॉट झाली. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. शेअर केलेल्या फोटोनंतर चाहत्यांकडून म्हटलं जातयं की, ती मुलीलाच जन्म देणार आहे. आता हे कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी मात्र आपल्या सगळ्यांनाच थोडी वाट पहावी लागणार आहे.
शॉपिंगला निघालेली रिहाना यावेळी देखील लोकांचं अटेंशन ग्रॅब करताना दिसली. तिने ब्लू स्वेटशर्ट आणि सिल्वर ग्रे मिनी स्कर्ट परिधान केला होता. हाय हिल्स आणि हाई पोनीटेल कलेली रिहाना आपल्या इन नॉन-स्टाईलिश कपड्यांमध्येही सुंदर दिसत होती. प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर रिहाना बरीच चर्चेत आली होती. तिचे एका पेक्षा एक फॅशन स्टेटमेंट प्रत्येकाचं ध्यान खेचून घेतं.