मुंबई : सोशल मीडियावर स्टारकिड्सची फॅन फॉलोइंग एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. त्यांच्या एका पोस्टवर लाखो लाईक्स येतात. ते हेडलाईन्समध्ये राहतात. त्यांच्या जन्मापासून ते पहिल्यांदा शाळेत जाणे, सोशल मीडियावर अकाऊंट बनवणे किंवा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे, अशी चर्चा बातम्यांमध्ये असते. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी खास असतो.
कोण आहे समारा साहनी?
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठे नाव 'कपूर फॅमिली'चे आहे. काही काळापूर्वी, नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची नात समारा साहनी यांनी सोशल मीडियावर एक खाते तयार केले आहे. या अकाऊंटद्वारे ती चाहत्यांसह मजेदार व्हिडिओ आणि कुटुंबासोबत घालवलेले काही सुंदर क्षण शेअर करते. रणबीर कपूरची भाची म्हणजेच रिद्धिमा कपूर साहनीची मुलगी समारा साहनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहायला लागली आहे.
हे खाते त्यांची आई रिद्धिमा सांभाळते. यावर आतापर्यंत 30 पोस्ट झाल्या आहेत. त्याचवेळी तिच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे झाले तर 14.3 हजार लोक तिला फॉलो करतात. समारा स्वतः 21 लोकांना फॉलो करते. त्यात आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या नावाचा समावेश आहे. ती नीतू कपूर आणि आई रिद्धिमा कपूर साहनी यांनाही फॉलो करते. समाराचे वडील भरत साहनी हे व्यवसायाने व्यापारी आहेत.
भाची समाराला मामा रणबीर कपूरचा नंबर लीक करायचा होता, रिद्धिमाचा खुलासा
कपिल शर्मा शोमध्ये रिद्धिमाला विचारले की, तिच्या मैत्रिणींनी कधी रणबीरचा नंबर मागितला आहे का? यावर रिद्धिमाने मुलगी समाराचा प्लॅन उघड केला. ती म्हणाली, 'मुलीला शाळेत कॅप्टन व्हायचे होते. त्यामुळे मुलींमध्ये रणबीरचा नंबर लिक होऊ द्या, मला मते मिळतील,असा समाराचा प्लॅन होता. 'आपल्या मुलीच्या या खोडकर प्लॅनचा हसत-हसत उल्लेख करत रिद्धिमा म्हणाली की, तिने प्लॅन ऐकल्यानंतर समाराला तसे करण्यास नकार दिला होता.
मामा रणबीर कपूरबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात दिसणार आहेत. समारा आणि आलियाचे चांगले संबंध आहेत. समारा आणि आलिया अनेकदा नीतू कपूर आणि रिद्धिमा साहनीच्या पोस्टमध्ये एकत्र दिसल्या आहेत. समाराला आलिया खूप आवडते. आलिया भट्ट देखील रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत अनेकदा पार्टी करताना दिसत आहे.