रणबीर कपूरचा मोठा निर्णय; कुटुंबासाठी तो किती मोठा त्याग करतोय पाहिलं?

Ranbir Kapoor Serious Career Break:  रणबीर कपूरनं आपल्या करिअरमधून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. सध्या याबद्दल त्यानं स्वत:हूनच खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. आपल्या कुुटुंबातील ही महत्त्वाची जबाबादारी निभावण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचे कळते आहे. परंतु नक्की काय हे आपण या लेखातूनच पाहुया. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 26, 2023, 01:15 PM IST
रणबीर कपूरचा मोठा निर्णय; कुटुंबासाठी तो किती मोठा त्याग करतोय पाहिलं? title=
ranbir kapoor confirms to take 6 months career break for daughter raha

Ranbir Kapoor Career Break: रणबीर कपूर हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. यावर्षी त्याचा 'तू झुठी मैं मक्कार' आणि मागील वर्षी आलियासोबत त्याचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला होता. त्यामुळे 2018 मध्ये आलेला 'संजू' या चित्रपटानंतर रणबीर कपूरची ही नवी इनिंग सुरू झाली होती. आता त्याचा 'अॅनिमल' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर आल्यावर रणबीर कपूर आता कुठे सेट होतोय तोच आता त्यानं पुन्हा एकदा आपल्या करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं याबद्दल स्वत:हूनच खुलासा केला आहे. 2022 साली एप्रिलमध्ये त्यानं आलिया भट्टशी लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लेकीचा जन्म झाला. परंतु आपल्या कुटुंबासाठी मात्र त्याला फार वेळ देता आलेला नाहीये, अशी खंत त्यानं व्यक्त केली आहे. 

म्हणूनच त्यानं आपल्या करिअरमधून काही काळ ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. आपल्या चाहत्यांशी झूमवरून संवाद साधताना त्यानं याचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यावेळी तो नक्की काय म्हणाला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. यावेळी त्यानं स्वत:च याचा खुलासा केला आहे. जेव्हा राहाचा जन्म होणार होता तेव्हा त्यानं आपण आपल्या मुलाचे वडिल म्हणून काय करायला हवं याचा विचार त्यानं सुरू केला होता. तो म्हणाला होता की, ''जेव्हा माझं मूल हे 20 वर्षांचे होईल तेव्हा मी 60 वर्षांचा झालेला असेन. ही माझी भीती होती.'' त्याचा हा मुद्दा अगदी पटणारा होता. लग्नानंतरच्या बेबी प्लॅनिंगवर विचारलं असता त्यानं हे उत्तर दिले होते. 

हेही वाचा : रूपाली भोसलेला चक्क हवाई सुंदरीकडून मिळालं खास गिफ्ट! अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी...

यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, ''आयुष्य हे खूप सुंदर आहे. मी आता मोठ्या सुट्टीवर आहे. मी आता घरातच बसणार आहे. मी पुढील 5-6 महिने सुट्टीवरच आहे. राहाचा जन्म झाल्यानंतर माझं हे विचार होताच. मी Animal चित्रपटासाठी शूट करत होतो तेव्हा मी तिच्यासाठी फार वेळ देऊ शकलो नव्हतो.'' असं मतं त्यानं व्यक्त केले आहे. 

यावेळी त्यानं राहाचीही एक अपडेट दिली आहे. तो म्हणाला की राहा आता गोष्टी ओळखू लागली असून आता हळूहळू ती बोलूही लागली आहे. तिनं आता मा आणि पा असंही बोलायला सुरूवात केली आहे. यातून फार आनंद वाटतो असं तो यावेळी म्हणाला.