Ranbir Kapoor ने Alia Bhatt ला विचारलं, 'हमारी शादी कब होगी?'

 रणबीरने लग्नाची मागणी घालताच काय होतं आलियाचं Reaction?   

Updated: Dec 16, 2021, 12:29 PM IST
Ranbir Kapoor ने Alia Bhatt ला विचारलं, 'हमारी शादी कब होगी?' title=

मुंबई : बॉलिवूडचं लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे चाहते खूप दिवसांपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. त्यांचे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलले जात आहे. 2022 मध्ये हे जोडपे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. बुधवारी ब्रह्मास्त्रच्या मोशन पोस्टर लाँचच्या वेळी रणबीरने मीडियासमोर आलियाला विचारले की 'आपलं लग्न कधी होणार?' रणबीरच्या या प्रश्नावर आलियाने उत्तर दिलं आहे. 

पोस्टर लाँच दरम्यान रणबीर कपूरने प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. चाहत्याने एका चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की, रणबीर तू आलिया भट्टसोबत लग्न करणार आहेस की अन्य कोणत्या अभिनेत्रीसोबत? चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर रणबीरने मजेत दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर म्हणाला, 'गेल्या वर्षात आपण अनेकांना लग्न करताना पाहिलं नाही. मला वाटते की आपण त्यात आनंदी असले पाहिजे. यानंतर रणबीर कपूरने गर्लफ्रेंड आलिया भट्टला पाहिले आणि विचारले- आपण लग्न कधी करणार? '

रणबीरच्या या प्रश्नावर आलिया म्हणाली, 'तू मला का विचारतोस...' यावर अयान मुखर्जी म्हणाले, 'आज फक्त एक दिवस अत्यंत महत्त्वाचं आहे तो म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख...' आता सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोघांच्या लग्नाची चाहते वाट पाहत आहेत. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2017 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. कपूर आणि भट्ट कुटुंबं एकत्र सुट्टीवर जातात. 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमात रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन हे देखील या सिनेमात आहेत.