'केसरीया' चं मराठी व्हर्जन ऐकलत का? पाहा व्हिडीओ

रणबीर आलियाच्या 'केसरीया' गाण्याचं मराठी व्हर्जन, चर्चेत

Updated: Jul 21, 2022, 10:58 AM IST
'केसरीया' चं मराठी व्हर्जन ऐकलत का? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कोणतंही नवीन गाणं आलं की त्या गाण्याची ओठ ही नेटकऱ्यांना लागतेच. त्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’  चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्याचं आता मराठी व्हर्जन आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

केसरिया या गाण्याचं हे मराठी व्हर्जन श्रेयस देशपांडेनं गायलं आहे. श्रेयस हा पुण्याचा आहे. या मराठी व्हर्जनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. श्रेयसनं स्वत: हे गाणं लिहिलं आहे. 

दरम्यान, ‘केसरिया’ हे गाणं अरिजित सिंगनं गायलं आहे. या गाण्याला संगीत प्रीतम यांनी दिलं आहे आणि त्याचं गीत प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जवळपास सात वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग अखेर ९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रणबीर आणि आलिया यांच्यासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.