अरे व्वा! राणादाच्या घरी आला छोटा पाहुणा

छोट्या पडद्यावरील  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेला राणादा आणि पाठक बाईंनी आज चाहतावर्ग फार मोठा आहे.

Updated: Mar 4, 2021, 11:10 AM IST
अरे व्वा! राणादाच्या घरी आला छोटा पाहुणा title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेला राणादा आणि पाठक बाईंनी आज चाहतावर्ग फार मोठा आहे. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती, तर पाठकबाई ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली होती. हार्दिक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याने एक बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून हे बाळ कोणाचे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचा बाळासोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिकने एका गोंडस बाळासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'माझ्या प्रिय बहिणीला मुलगा झाला आहे.''आयांश तुझं आपल्या कुटुंबियात स्वागत आहे'' या आशयाचे कॅप्शन हार्दिकने त्या फोटोवर दिले आहे. हार्दिकच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिकला प्रसिद्धी मिळाली. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगा पतंगा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर हार्दिकने पदार्पण केले होतं. पण  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेने निरोप घेतल्याने, राणादा पुढील प्रोजेक्ट्ससाठी उत्सुक आहेत.